पंचामृत फवारणीचे टोमॅटोस रिझल्ट जबरदस्त

श्री. कौलास रामकृष्ण कदम,
मु.पो. कोराटे, ता. दिंडोरी, जि. नाशिक


मी अर्धा एकर टोमॅटो एन.एस.उत्सवची ५ जून २००३ रोजी लागवड केली. दरवर्षी इतर औषधांचा नेहमीप्रमाणे वापर करीत होतो. आमचे येथील साहेबराव गिरीधर कदम व बाळासाहेब माधवराव कदम हे डॉ.बावसकर सरांची औषधे द्राक्ष, टोमॅटो व कोबी ह्या पिकांसाठी वापरतात. त्यांनी मला जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर वापरण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या पिकांचे रिझल्ट पाहून मला ही औषधे वारपरावी असे वाटू लागले. लागवड केल्यानंतर २१ दिवसांनी पहिली फवारणी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी २५० मिली १०० लि. पाणी याप्रमाणात केली. सुरुवातीस ५ ते ६ दिवस झाडावरती कुठल्याही प्रकारचा फरक जाणवला नाही. परंतु आठवड्य दिवशी प्लॉट चांगल्या प्रक्रारे उठला. पत्ती चांगली झाली. करपा अजिबात नव्हता. फुटवा भरपूर झाला. फुलकळी वाढण्यास सुरुवात झाली. (वरील औषधे प्रत्येकी ५०० मिली विकत आणली आणि फवारणी करण्यासाठी औषधाच्या बाटलीचे झाकण खोकल्यावर मला असे वाटले की, पाण्यासारखी आहेत. (एरवीच्या औषधांसारखा उग्र वास नसल्याने) विश्वास बसला नाही. नंतर फवारणी केल्यानंतर मला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाले. नंतर उरलेला २५० मिलीचा डोस १०० लि. पाण्यातून १५ दिवसांनी फवारला. फुटवा चांगला होऊन फुलकळी चांगल्या प्रकारे वाढली. फुलगळ झाली नाही. पाने रुंद, जाड, टवटवीत झाली. भेटायला येणारे बरेच शेतकरी मला विचारात होते की कोणते औषध मारले. १५ दिवसांपासून माल खुडण्यास (तोडा करण्यास) सुरुवात केली. आतापर्यंत २५० ते ३०० जाळ्या (कॅरेट) माल निघाला. ५० ते ७० रु. असा दर असताना ८० ते ९० रु. भाव मिळाला. अजून माल चालू आहे. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या पंचामृत औषधाच्या फक्त दोन फवारण्या केल्या.