पंचामृत व प्रिझममुळे टोमॅटोला व्यापाऱ्यांकडून सतत मागणी

श्री. गुलाब पांडुरंग थोरात,
मु.पो. रोहोकडी, ता. जुन्नर, जि. पुणे


मी माध्यमिक शिक्षक असून शेतीची आवड असल्याने टोमॅटो नामधारी २५३५ या जातीचे ३० ग्रॅम बियाणे जर्मिनेटरची प्रक्रिया करून लागवड केली. जमीन हलकी व शेणखताचा अभाव असूनसुद्धा चांगल्या प्रतिची फळे मिळाली. सुरुवातीला फळे लहान होती. मात्र प्रिझम + क्रॉपशाईनर + राईपनरच्या फवारणीनंतर फुटवा चांगला होऊन फुलांची संख्या वाढली व फळे चांगल्या प्रतीची मिळाली. बाजारात व्यापाऱ्याकडून सतत मागणी राहिली. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे वापरल्यानेच टोमॅटो चांगल्या प्रतीचे मिळाले. तरी एकंदर प्रिझम, क्रॉपशाईनर, राईपनर या औषधांचा टोमॅटोसाठी चांगला उपयोग होत असल्याचे मला आढळून आले. टोमॅटोचे उत्पान्नातही वाढ झाली.

मागील वर्षी कांदा रोपांची ६ वाफे अगोदर लागवड केली होती. नंतर ४ वाफ्यास कल्पतरू सेंद्रिय खत वापरले असता त्या रोपांची वाढ चांगली झाली. रोप सशक्त व हिरवेगार होते. दोन्ही रोपांच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती. त्यामुळे या वर्षी पहिल्या पासूनच डॉ. बावसकर सरांचे तंत्रज्ञान वापरायचे ठरविले आहे.