साऱ्या हैद्राबाद मार्केटमध्ये टोमॅटोची चर्चा

श्री. विद्याधर कुलकर्णी,
मु.पो. सिताळगेरा, ता. हुमनाबाद, जि. बिदर,
फोन नं.(०८४८३) ३६६९३५


आम्ही रासायनिक खते व विषारी किटकनाशके फवारून जे शेतकरी ३६ महिने आपल्या भेटीसाठी विचारत होते. त्यांचा अनुभव मी फोनवर आपणास सांगत आहे. चक्रय्यास्वामी, टाळमडगी, ता. हुमनाबाद, जि. बिदर (कर्नाटक), हे पुर्ण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करून टोमॅटो काढून हैद्राबाद मार्केटला पाठवत आहेत. सध्या बाजार ७ रु. किलो. २० किलोचा क्रेट असेल तर १४० रु. एका क्रेटला मिळतात. रोज २ एकरातील माल जात आहे. म्हणजे रोजची पट्टी २२,४०० रु. ची विक्री होत आहे. हौद्राबाद मार्केटमध्ये एवढे चांगले टोमॅटो कुठले. कसे? असे रोज शेतकरी दलाल. अनेक लोक विचारत आहेत इतका चांगला माल कसा म्हणून सतत विचारात आहेत. त्यांना आम्ही डॉ. बावसकर टेक्नॉलॉजी, पुणे यामुळे सारे घडले आहे. हे सर्व सरांच्या टेक्नॉलॉजीने घडले असे सांगितले तेव्हा ते थक्क झालेत. आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी टोमॅटो, कलिंगड, आले या पिकावर शिवकुमार स्वामी, चक्रय्यास्वामी व मी स्वतः (विद्याधर कुळकर्णी) हे वापरत असून सारे आसपासच्या जिल्ह्यातील शेतकरी या प्लॉटला भेट देत आहेत.

हे सर्व शेतकरी मित्र जे परिस्थितीने गांजले (आर्थिक खालावले) होते ते इतके खुष आहेत की मला त्यांनी आपणास फोन करून आभार मानायला सांगितले आपली मासिके मी स्वतः कन्नडमध्ये भाषांतर करून कर्नाटकामध्ये मी आपल्या विज्ञानाचा देवदूत बनेन. त्याचा साऱ्या कन्नड बांधवांना फायदा होईल म्हणून भाषांतराची परवानगी असावी. धन्यवाद सर !