टोमॅटोच्या दूरीला ९० ते ११० फळे, बाजारभाव ६० ते ७० मात्र आमचे मालास १०० ते ११०

श्री. हरिश्चंद्र विठ्ठल कांडेकर,
मु.पो. जातेगाव, ता.जि. नाशिक


आम्ही नागपंचमीच्या वेळेस ३० गुंठे एन. एस. २५३५ ची लागवड केली. सुरुवातीस मला डॉ.बावसकर सरांच्या पंचामृत औषधांची माहिती नव्हती. त्यामुळे प्लॉट निघेपर्यंत या तंत्रज्ञानाचा वापर करत आला नाही. 'कृषी विज्ञान' मासिक विकत घेतल्यानंतर या औषधांचा वापर करण्याचे ठरविले. या अगोदर प्लॉटमधून ७ ते ८ जाळी (कॅरेट) माल निघत असे व झाडे घुबडया, व्हायरस रोगांनी जाम झाली होती. दुरी खोडवा घेण्याचे ठरवून डॉ.बावसकर सरांच्या नाशिक शाखेतून पुर्ण माहिती घेतली. १ लि. जर्मिनेटरची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. फुटवा चांगला झाला. थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर व प्रोटेक्टंट यांच्या एकंदरीत ४ फवारण्या प्रत्येकी ५०० मिली/२०० लि. पाणी या प्रमाणात दर १० दिवसांनी केल्या. झाडांची वाढ जोमदार, रोगमुक्त होऊन फुलकळी वाढली. सुरूवातीस झाड बारीक होते. ते मोठे होऊन तारेच्या वर गेले. करपा, व्हायरस आला नाही. फळांना शाईनिंग फारच चांगली मिळाली. दरीत झाडाला ९० ते ११० फळे आहेत. ६० ते ७० रु. असतानाही २७/१२/२००३ रोजी मालाला १०० ते ११० रु. कॅरेट असा दर मिळाला. दिवसाआड २३ - २५ कॅरेट माल निघतो.

ऑक्टोबरमध्ये रोहिणी टोमॅटोची अर्धा एकरमध्ये लागवड केली होती. प्लॉट दीड महिन्याचा असताना पंचामृत औषधांच्या फवारण्या सुरू केल्या. कल्पतरू २० किलो/अर्धा एकरासाठी दिले. सुरुवातीस पाने पुर्ण पिवळी झालेली व घुबडया व्हायरसने जमा झाली होती. ती पंचामृत औषधांच्या प्रत्येकी ५०० मिली/१०० लि. पाण्यातून फवारण्या दर १० दिवसाच्या अंतराने केल्यामुळे पाने पुर्णपणे हिरवीगार झाली. फळांची संख्या वाढली. शेंडा वाढून फुटवा मोठ्या प्रमाणात झाला. फळांना शाईनिंग मोठ्या प्रमाणात आहे. फुलकळी वाढली, माल मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. करपा, पाने पिवळी पडणे हे प्रमाण आटोक्यात आले. जमिनीत कस नसताना झाडांवर १२० ते १४० फळे मिळाली.