डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने टोमॅटोचा यशस्वी खोडवा

श्री. अशोक हिंदुराव धुमाळ,
मु.पो. आदर्की बु।।, ता. फलटण, जि. सातारा


मी टोमॅटो अविनाश २ चे एक पाकिट बियाची रोपे १० गुंठ्यामध्ये लावली. पहिला बाहेर संपल्यानंतर म्हणजे जुलै २००२ मध्ये पंचामृत फवारणी केली. पहिल्या फवारणीनंतर नविन फुट जोरात निघाली, तर दुसऱ्या फवारणीनंतर निघालेली फुट जोमाने वाढली. ४० दिवसात पुर्ण टोमॅटोचा माल चालू झाला. तर १५० कॅरेट (५ टन) माल निघाला व आधीचा माल सुद्धा तेवढाच निघाला होतो. नेहमीचा अनुभव असा आहे की, खोडव्याचा माल एवढा निघत नाही. परंतु पंचामृत तंत्रज्ञानाच्या ८ दिवसाला एक अशा ४ फवारण्या केल्यामुळे एवढा माल निघाला. मालाला शाईनिंग भरपूर असल्यामुळे सुरूवातीच्या मालापेक्षा जास्त भाव (६० रु. १० किलो) मिळाला म्हणजे खोडवा असून सुद्धा पंचामृतामुळे उत्पन्न मिळू शकले. टोमॅटोचा अनुभव पाहता गणेश एक एकर डाळींब लावणार आहे. त्याला सुरूवातीपासून पंचामृत तंत्रज्ञान वापरणार आहे.