डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे टोमॅटो कडक, दर्जेदार व खोडवाही उत्तम

श्री. नामदेव आबाजी शिंदे,
मु.पो. पांगरी शिंदेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे


मागच्या वर्षी आषाढात (जुन, जुलै २००४) टोमॅटो २५३५ डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने केली होती. मासिकामध्ये सांगितल्याप्रमाणे १ पुडी जर्मिनेटरमध्ये भिजवून टाकली होती. तर बियाण्याची १००% उगवण झाली. रोप उगवून आल्यापासून पंचामृत फवारण्या केल्यामूळे २० दिवसातच रोप लावायला आले. लागण करताना रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून घेतल्यामुळे १००% जगली. नांगी एक सुद्धा पडली नाही. लागण केल्यानंतर १५ दिवसांनी खरपणी केली. २०:२०:० चे एक पोते टाकले. खांदणी करून भर दिली. नंतर पंचामृत फवारणी केली. तार, सुतळीने बांधली. एक महिन्यातच भरपूर फुलकळी लागली. फुले लागल्यापासून एक महिन्यात पहिला तोडा १० खोकी (२२ ते २३ किलो) माल मिळाला. फळाची साईज मोठी व एकसारखी होती. चमक भरपूर होती. विशेष म्हणजे माल कडक (टणक सालीचा) निघाला. त्यामुळे ९०, १००, ११० रु./१० किलो असा बाजार मिळाला. इतरांपेक्षा नेहमी ४ ते ५ रु. ने भाव जास्त मिळाला. शेवटपर्यंत एकसारखा माल २५० खोके मिळाला. एकूण खर्च जाऊन ४ ते ५ महिन्यात १० गुंठ्यात १८,०००/ - रु. झाले. नंतर प्लॉट सोडून दिला. मात्र तो सुद्धा परत फुटला. त्याला १२५ खोकी निघाली त्याचे ४ हजार रु. झाले. म्हणजे चालू व खोडवा मिळून २२ हजार रुपये झाले. हा या तंत्रज्ञानाचा अनुभव पाहता मी आज रोजी परत नविन लागवडीसाठी याच टेक्नॉलॉजीचा करणार आहे.