१० गुंठे टोमॅटोपासून ५० हजार

श्री. भास्कर तुकाराम आवटे,
मु.पो. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे.
फोन (०२१३३) २८५३१३


मी गेले ४ वर्षापासून (२००२) डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करीत असून यावर्षी मी टोमॅटो अभिनव जातीची रोपे तयार केली. नंतर ३ एप्रिलला जर्मिनेटर ४० मिली + प्रोटेक्टंट पी २० ग्रॅम + १० लि. पाणी बादलीमध्ये घेऊन त्यामध्ये रोपे बुडवून लागण केली, त्यामुळे रोपांची मर झाली नाही व वाढ जोमाने झाली. नंतर ८ दिवसांनी १० लि. पाण्यामध्ये ३० मिली जर्मिनेटर घेऊन द्रावण थोडे - थोडे रोपांच्या मुळाशी सोडले. त्यानंतर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ३० मिली प्रति पंपाला घेऊन २० दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या केल्या. त्यामुळे झाडांची वाढ जोमाने चालू झाली. फुट वाढली, रोग किडीचा प्रादुर्भाव झाला नाही. नंतर फुलकळी लागल्यावर गळ झाली नाही. मालाची फुगवण चांगली झाली. पहिला तोडा ३ जूनला झाला. ३५५ रु. कॅरेटला भाव मिळाला. एकूण २१० कॅरेट माल निघाला. अजून ५ - ६ तोडे होतील. हा प्लॉट श्री मंगेश दगडू आवटे यांनी अर्धोलिने केला आहे. या टोमॅटोचे आतापर्यंत ४१,००० रु. झाले आहेत, खर्च ६५०० रु. आला. झाडावर अजून मागे माल शिल्लक आहे. त्याचे ५ ते ७ हजार रु. होतील, हे उत्पन्न फक्त १० गुंठ्यामध्ये मिळाले, ते केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळेच.