पावसाच्या पाण्यात टोमॅटोची झाडे बुडूनही रोगमुक्त व टवटवीत, हिरवीगार

श्री. साहेबराव नामदेव गवळी,
मु.पो. माडसांगवी (विंचूर गल्ली), जि. नाशिक


आम्ही टोमॅटो २५३५ एक एकरची १५ जून रोजी लागवड केली होती. आमच्या गावातील अरुण गवळी, भाऊसाहेब गवळी यांनी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर मिरची, टोमॅटो, द्राक्ष बागांसाठी केलेला होता. त्यांचा अनुभव, रिझल्ट पाहून मी या तंत्रज्ञानाचा वापर टोमॅटो पिकासाठी सुरुवातीपासून करण्याचे ठरविले. टोमॅटोचे बियाणे जर्मिनेटर ३० मिली/१ लि. कोमट पाण्यात ४ तास भिजत ठेवले. उगवण चांगली झाली. रोपांसाठी जर्मिनेटर व थ्राईवर ३ मिली/लि. पाणी या प्रमाणत फवारून दिले. रोपे जोमदार वाढली. लागणीनंतर १५ दिवसांनी पहिली फवारणी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईर ३ मिली/लि. पाणी व दुसरी फवारणी ३० दिवसांनी प्रत्येकी ४ मिली/ लि. पाणी या प्रमाणात केली. व्हायरस घुबडया या रोगांचा प्रादुर्भाव अजिबात नव्हता. टोमॅटोचा फुटवा फारच चांगला झाला. फुलकळी मोठ्या प्रमाणात लागली.

आमच्याकडे पाऊस खूप झाला. टोमॅटोची झाडे पुर्ण पाण्यात असतानासुद्धा झाडे हिरवीगार, रोगमुक्त राहिली. तिसऱ्या व चौथ्या फवारणीमध्ये जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर प्रत्येकी ५ मिली/लि. पाणी स्ट्रेप्टो, बाविस्टीन सोबत घेऊन फवारणी केली. टोमॅटोची झाडे कंबरेइतकी वाढली. टोमॅटो फळे मोठ्या प्रमाणात लागून आकार वाढला. फळांना शाईनिंग चांगली मिळाली. फळे टणक राहून, टिकाऊपणा चांगला मिळाला. बदला माल फारच कमी. मार्केटमध्ये हा माल चांगल्या भावाने विक्री झाला.