प्रतिकूल परिस्थितीत टोमॅटोचे ३० गुंठ्यात ३ लाख रु.

श्री. गणेश तानाजी मांडे,
मु.पो. ओझर, ता. जुन्नर, जि. पुणे


मी गेल्या वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करीत आहे. गेल्या वर्षी मी टोमॅटो व ऊस पिकासाठी हे तंत्रज्ञान वापरले आहे. या वर्षी सुरुवातीपासूनच टोमॅटो बी लावताना जर्मिनेटर २५ मिली प्रोटेक्टंट १० मिली + पाणी २५० मिली या द्रावणामध्ये ४ पुड्या बियाला प्रक्रिया करून रोपासाठी टाकले. उन्हाळा (प्रतिकूल परिस्थिती) असल्यामुळे एक पुडी बी जास्त टाकले. परंतु जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केल्यामुळे १००% उतारा झाला.

उन्हाचा उगवण शक्तीवर काहीच विपरीत परिणाम झाला नाही. रोप १ महिनाभ वाढू दिले, काडी थोडी जाड होऊ दिली. नंतर लागवड करताना जर्मिनेटर ३० मिली प्रोटेक्टंट १० मिली + पाणी यामध्ये संपूर्ण रोपे (शेन्डे, मुळीसह) भिजवून लावली. त्यामुळे रोप सतेज राहीले. लागवडीनंतर मर झाली नाही व सफेद मुळी जोरात फुटली, तसेच मुळांची अन्नद्रव्ये शोषूण झाडांना पुरवण्याची क्षमता जर्मिनेटर ३० मिली + प्रोटेक्टंट १५ ग्रॅम + पाणी १० लि. हे द्रावण करून मुळाशी सोडले, त्यामुळे मर झाली नाही, जारवा (सफेद मुळी) भरपूर वाढली.

खत - १) पहिला डोस - लागवडीनंतर २० दिवसांनी १८:४६ च्या २ बॅगा + कल्पतरू सेंद्रिय खत ३ बॅगा + सुक्ष्मअन्नद्रव्ये १० किलो याप्रमाणे दिला.

२) दुसरा डोस - लागवडीनंतर ४५ दिवसांनी १९:१९:१९ च्या ३ बॅगा + कल्पतरू सेंद्रिय खत ३ बॅगा दिले.

फवारणी :
१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५ मिली.+ थ्राईवर २५ मिली. + क्रॉंपशाईनर २५ मिली.+ प्रोटेक्टंट १० ग्रॅम + १५ लि. पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २० दिवसांनी) : जर्मिनेटर ३० मिली.+ थ्राईवर ३० मिली. + क्रॉंपशाईनर ३० मिली. + स्ट्रेप्टोसायक्लीन २ ग्रॅम + १५ लि. पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ४० दिवसांनी ) : थ्राईवर ४० मिली. + क्रॉंपशाईनर ४० मिली. + न्युट्राटोन २० मिली. + प्रोटेक्टंट १५ ग्रॅम + १५ लि. पाणी.

४) चौठी फवारणी : (लागवडीनंतर ५५ दिवसांनी) : क्रॉंपशाईनर ५० मिली + न्युट्राटोन ४० मिली + राईपनर ४० मिली + १५ लि. पाणी.

५) पाचवी फवारणी : (लागवडीनंतर ७० दिवसांनी) : क्रॉंपशाईनर ५० मिली + कंट्रोल १५ ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन २ ग्रॅम + १२ लि. पाणी (पेट्रोल पंप)

६) सहावी फवारणी : (लागवडीनंतर ८५ दिवसांनी) : राईपनर ५० मिली + न्युट्राटोन ५० मिली +क्रॉंपशाईनर ५० मिली + १२ लि. पाणी (पेट्रोल पंप)

७) सातवी फवारणी : (प्लॉट संपत आल्यानंतर नवीन फुट फुटण्यासाठी) : प्रिझम ४० मिली + थ्राईवर ४० मिली + राईपनर ४० मिली + १२ लि. पाणी.

अशा पद्धतीने वरीलप्रमाणे फवारण्या घेतळ्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये ३० गुंठे क्षेत्रातून ८०२ कॅरेट माल निघाला. माझ्या मालाला १५०, १८० ते ५०० रु. प्रति कॅरेट भाव मिळत. मार्केटमध्ये मालाला शायनिंग, कलर जास्त असल्यामुळे हमखास आम्हाला भाव जास्त मिळत होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरील फवारणी त प्रोटेक्टंट (किटकनाशक) हे आयुर्वेदिक पावडर ३ ते ४ तास पाण्यात भिजवून गाळून घेऊन फवारणी केल्यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला नाही, माझ्या शेजारचा प्लॉट पांढऱ्या माशीने गेला.

उत्पन्न: ८०२ (२५ ते २८ किलो वजनाचे कॅरेट) बाजारपेठ : नारायणगाव, संगमनेर

खर्च : सर्व मशागत, औत, खुरपणी, औषधे खते याचा एकूण ३०,००० रु. एकूण उत्पन्न:३,००,००० लाख रूपये खर्च वजा जाता २ लाख ७० हजार रूपये निव्वळ नफा मिळाला.