१८ एकर टोमॅटोसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा प्रतिकूल परिस्थितीतही फायदा

श्री. भाऊसाहेब किसनराव नाईकवाडी,
मु.पो. निगडोळ, ता. दिंडोरी, जि. नाशिक


माझी शेती अकोले तालुक्यात आहे. तेथे मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांचा वापर करत होतोच आणि आता नवीन जमीन नाशिक जिल्ह्यात दिंडोडी तालुक्यात निगडोळ गावी १२० एकर घेतली आणि पहिल्याच वर्षी १८ एकर टोमॅटोची लागवड केली. लागवड झाल्यावर ८ दिवसांनी जर्मिनेटर + थाईवर + क्रॉपशाईनर या औषधांची पहिली फवारणी केली असता वाढ जोमाने होऊ लागली. मर व गळ असा प्रकार झालाच नाही. पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बरेच शेतकऱ्यांचे प्लॉट निकामी झाले. आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांची पहिली फवारणी केली नसती तर आमचेही फार मोठे नुकसान झाले असते. अशातच दुसरी फवारणी थ्राईवर + क्रॉपशाईनर या औषधांची केली असता झाडांवर काळोखी आली. फुटवही चांगला होऊन वाढ जोमदार झाली आणि झाडातच रोग प्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे करपा, घुबड्या हा रोग आला नाही. झाडांची वाढ तर ४ फुटापर्यंत झाल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी हे आवर्जुन प्लॉट बघायला येत असता आणि विचारपुससुद्धा करत की, "ही कोणती टोमॅटो आहेत आणि कोणती अशी औषधे वारपाली की, त्यामुळे इतका फुटवा य वाढ झाली." तेव्हा मी सांगितले की, आजच्या काळात फक्त डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच वरदान आहे. त्याचा सातत्याने वापर करीत आहे. तिसरी फवारणी थ्राईवर + क्रॉपशाईनर + राईपनरची केली. या औषधांची फुलकळी मोठ्या प्रमाणात लागली. फळांना चमक व कडकपणा आला. फळे मोठ्या आकाराची, गडद रंगाची, एकसारखी मिळाली. विशेष म्हणजे फळसड अजिबात झाली नाही. माल मोठ्या प्रमाणत चालू झाला. सुरुवातीला चांगले भाव मिळाले. एकरी ८० क्विंटल उत्पादन निघाले. पाण्याची कमतरता असूनसुद्धा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे फवारली तर पीक पाण्याचा ताणसुद्धा सहन करून उत्पादन बऱ्यापैकी मिळते याचा यावेळेस अनुभव आला. द्राक्ष बागेची नवीन लागवड ३२ एकरमध्ये करणार आहे. त्यासाठी जर्मिनेटर कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करणार आहे.