टोमॅटोचा खर्च ३० - ३५ हजार, उत्पन्न १ लाख २० हजार

श्री. प्रविण रा. फुलझेले,
मु.पो. आर्वी, ता. हिंगणघाट, जि. वर्धा -४४२००१.
मो. ९९६०३१२९३१


मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या कृषी विज्ञान मासिकाचा वाचक असून मी त्यातील वेगवेगळ्या पिकांविषयीचे शेतकऱ्यांचे अनुभव वाचून प्रभावीत झालो. मासिकामध्ये फोरसाईट कृषी केंद्र, वर्ष यांची जाहिरात वाचली व या कृषी केंद्राला भेट दिली. त्यांच्याकडून मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांची माहिती घेऊन त्याचा टोमॅटो पिकासाठी वापर करण्याचे ठरविले.

अंकुर कंपनीच्या वैशाली जातीची माध्यम प्रतीच्या २० गुंठे जमिनीत ५ x १.५ फुटावर १५ जून २०१५ रोजी जर्मिनेटरच्या द्रावणात रोपे बुडवून लागवड केली. त्यामुळे मर झाली नाही. रोपे जोमदार वाढीस लागली. लागवडीनंतर १५ - २० दिवसांच्या अंतराने थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ५०० मिली + हार्मोनी २०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + १५० लि. पाणी याप्रमाणे एकूण ३ फवारण्या केल्या. एवढ्यावर झाडांची निरोगी वाढ होऊन फलधारणा चांगल्याप्रकारे होऊन फळांचे पोषण झाले. १५ जून २०१५ ला लावलेले टोमॅटो सप्टेंबरच्या सुरुवातीस चालू झाले. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमीत फवारण्यांमुळे फळांची क्वॉलिटी नेहमीपेक्षा व बाजारातील इतर शेतकऱ्यांपेक्षा चांगली मिळाल्याचे आम्ही प्रथमच अनुभवले.

तोडे चालू झाल्यावर पुढेही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या २ फवारण्या १ - १ महिन्याला केल्या. एवढ्यावरच दिवसाआड २० गुंठ्यातून १० - १२ क्रेट माल निघत होता. हिंगणघाट मार्केटला सुरुवातीस ४०० रु./क्रेट भाव मिळाला. त्यानंतर हिवाळ्यात भाव कमी होऊन १०० ते १५० रु./क्रेट भाव मिळाला. तरी या टोमॅटोपासून १ लाख २० हजार रु. हे केवळ आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी मिळाले. यासाठी एकूण ३० ते ३५ हजार रू. खर्च आला. अशा पद्धतीने आम्हाला अर्धा एकरातून ८० हजार रु. नफा मिळाला.