दिड एकरात टोमॅटोचे एरवी ९०० क्रेट उत्पादन पण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे १५०० क्रेट ५।। लाख रु.

श्री. फिरोज हमीद पटेल,
मु. पो. हुनजी (के), ता. जुन्नर, जि. पुणे.
मो. ९९७५९७८३८६


आम्ही अभिनव टोमॅटोची लागवड १५ फेब्रुवारी २०१० ला केली होती. मुरमाड प्रतिच्या दीड एकरमध्ये ३' x १' वर लागवड होती. या टोमॅटोला रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लावण्यापासून माल काढणीपर्यंत डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर केला तर दरवर्षी एकरी ५०० - ६०० क्रेट निघणारा माल चालू वर्षी दीड एकरात १५०० क्रेट निघाला.

सुरुवातीला जर्मिनेटरची प्रक्रिया (जर्मिनेटर १०० मिली + १० लि. पाणी या द्रावणात मुळ्या बुडविणे) केल्याने रोपांच्या नांग्या पडल्या नाहीत. शिवाय वाढही लवकर सुरू झाली. हा फरक जाणवल्यावर पुन्हा प्लॉट १५ दिवसांचा असताना जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी २५० मिली/१०० लि. पाणी याप्रमाणे केली. तर प्लॉट निरोगी राहून वाढ, फ़ुट होऊ लागली. नंतर ८ ते १० दिवसांनी कल्पतरू सेंद्रिय खताच्या २ बॅगा आणि २३:२३ खताच्या २ बॅगा एकत्र मिसळून बुंध्याशी दीड एकरसाठी दिले आणि मातीची भर लावली. नंतर पाणी दिल्यानंतर आठवड्याने थ्राईवर, क्रॉपशाईनरची बुरशीनाशकासह फवारणी केली. तर प्लॉट ऐन उन्हाळ्यातही जोमाने वाढू लागला. पाने, फुटवा तेजीत होता. कल्पतरू खतामुळे जारवा वाढलेला होता.

यानंतर दुसरा खताचा डोस प्लॉट दीड महिन्याचा असताना कल्पतरू खताच्या २ बॅगा आणि १०:२६:२६ खताच्या २ बॅगा यांचा एकत्र दिला. त्याने वाढ, फुटावा वाढून फुलकळी लागण्यास सुरूवात झाली. या अवस्थेत फुलकळी गळ उन्हामुळे होऊ नये यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५० मिली/पंप याप्रमाणे फवारणी केली. त्यामुळे गळ न होता फळधारणा झाली.

प्लॉटला ४ फुट उंचीवरून तयार ओढली होती तर फळधारणा एवढी झाली होती की दुसऱ्या बांधणीच्या वेळी फांद्या एका माणसाला सुतळीने तारेला बांधावी लागत होती.

फळे पोसण्यासाठी आणि शायनिंगसाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर सोबत राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी ५० मिली/पंपास घेऊन फवारण्या दर १५ दिवसाला चालू होत्या. त्यामुळे मी महिन्यात प्लॉटचे तोडे चालू झाले. सुरुवातीला ४० - ५० क्रेट माल निघत होता तेव्हा भाव कमी १०० ते १५० रु. क्रेट होता. नंतर पुढे मालही वाढला आणि बाजारभावही चांगला मिळाला. दिवसाआड तोड्याला ८० ते १०० क्रेट माल निघू लागला. शिवाय बाजारभावही ३०० ते ४५० रु./ क्रेट मिळाला. माल अतिशय आकर्षक, चमकदार, टवटवीत, टणक आणि मोठा, एकसारखा असल्याने बाजार पेठेतील एक नंबरचा भाव मिळत होता. १५ ऑगस्टपर्यंत माल चालू होता. या दीड एकरात एकूण १५०० क्रेट टोमॅटो निघाला. त्याचे ५।। लाख रु. झाले. आम्ही दरवर्षी टोमॅटो लागवड करत असतो, मात्र ५०० ते ६०० क्रेट पेक्षा जास्त माल कधी मिळाला नाही. तो चालूवर्षी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या सप्तामृताच्या ७ फवारण्या आणि कल्पतरू खताचा दोन वेळा वापर आणि थोड्या रासायनिक खत व मोजक्या औषधांवर दीड एकरात १५०० क्रेट उत्पादन मिळाले.