चक्रीवादळाने ७०% प्लॉट रोगग्रस्त, उद्धवस्त झालेला १० गुंठ्यात टोमॅटोचे ६० हजार

श्री. संतोष शामराव गायकवाड,
मु.पो. पिसाळवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा.
मो. ९९२३६०८११९


१३८९ वाणाची टोमॅटोची ३००० रोपे आणून सप्टेंबर २००९ अखेरीस लावली होती. झाडांनी वाढ चांगली चालू होती. जमीन काळी आहे. लागवड १।।' x २।।' वर होती. १ महिन्याने कल्पतरू खत २ बॅग आणि जयकिसानचे सम्राट २ बॅगा देऊन मातीची भर लावली. मात्र त्यानंतर ऑक्टोबर २००९ अखेरीस चक्री वादळ आल्याने प्लॉट उद्ध्वस्त झाले. गावातील अनेक प्लॉट गेले. आपलाही ७०% प्लॉट खराब झाला होता. झाडांना शेंडा नव्हता. पानांवर करपा आला होता. यावर थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर प्रत्येकी ५ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी घेतली. त्याने शेंडा वाढ सुरू होऊन झाडे फुटीने हिरवीगार होऊन लागली. दुसरी फवारणी पुन्हा वरीलच औषधांची केली तर फुटवा एवढा वाढला की, एका - एका झाडाला एकावेळी बांधणीला ८ ते १० सुतळी लागत होती. शिवाय पुन्हा प्लॉट १० दिवसांनी बांधणीला येत असे. नंतर फुलकळी लागली. ३००० काडी १० गुंठ्यात लागली होती. तर फळे ही भरपूर लागल्याने दररोज ५ - ६ क्रेट माल सहज निघत होता. ३ महिने प्लॉट चालू होता. यावेळेस पुन्हा २ फवारण्या सप्तामृताच्या केल्या होत्या. सर्व फळे शिरवळला विकली. तेथे ३०० ते ३५० रु. क्रेटला भाव मिळत होता. हा प्लॉट ३ महिने चालल्यावर परत सप्तामृताच्या फवारण्या केल्याने फुटवा वाढला. त्याला लागलेला माल २ महिने चालला. नंतरच्या मालाला १०० ते १५० रु. क्रेटला भाव मिळाला. एप्रिल २०१० अखेरपर्यंत माल चालू होता. नंतर - नंतर विहीर बागायत आठमाही असल्याने पाणी कमी पडू लागले. तरी या टोमॅटोचे १० गुंठ्यात ६० हजार रु. खर्च जाऊन झाले. या अनुभवावरून चालू वर्षी १३ जुलै २०१० ला नैना टोमॅटोची ५००० काडी लावली आहे. ती १ महिन्याची झाली आहे. झाडे भरीला आली आहेत. याला आज १४/८/२०१० रोजी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईनपर, प्रिझम प्रत्येकी १ लि. आणि प्रोटेक्टंट १ किलो तसेच कल्पतरू खत ५० किलोची १ बॅग घेऊन जात आहे.

हळवी कांदा अर्धा एकरची लागवड चालू आहे. त्यालाही वरील औषधे वापरणार आहे.