टोमॅटोला ६० ते ९० रु. भाव असून आम्हास मात्र ९० ते ११० रु. भाव मिळाला

श्री. दिनकर बाबुराव वाघ,
मु.पो. महोरावणी, ता.जि. नाशिक


मी ५ ऑक्टोबर २००३ रोजी एक एकर २५३५ टोमॅटो ची ३' x २ ' अंतरावर लागवड केली. सुरुवातीस यावर्षी डॉ.बावसकर सरांची पंचामृत औषधे वापरण्याचे ठरविले. बियांसाठी ३० मिली जर्मिनेटरचा १ लि. कोमट पाण्यात वापर केला. उगवण ९९% झाली. रोपांवर जर्मिनेटर व थ्राईवर प्रत्येकी ३० मिली दर १० दिवसांच्या अंतराने २ वेळा फवारणी केल्यामुळे रोपांवर तजेलदारपणा व तरतरीत रोपे तयार झाली. पुनर्लागणीच्या वेळेस १० लि. बादलीमध्ये जर्मिनेटर २५० मिली घेऊन रोपे बुडवून लावली. रोपे जोमदार वाढून मुळ्यांची वाढ मोठ्या प्रमाणत झाली. मर अजिबात झाली नाही. लागवडीनंतर दर १५ दिवसांनी फवारणी पत्रकाप्रमाणे पंचामृत औषधांचा (जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर व प्रोटेक्टंटचा) वापर एकंदरीत चार फवारण्यात प्रत्येकी २ मिली/१ लि. पाण्यामध्ये घेऊन फवारण्या केल्या. टोमॅटो पिकावर घुबडया, व्हायरस रोगांना प्रतिबंध झाला. या औषधासोबत किटकनाशकाचा वापर केल्यामुळे मावा, लालकोळी, अळीचे नियंत्रण करणे शक्य झाले. फुलकळी मोठ्या प्रमाणात वाढली. प्रत्येक झाडांपासून २०० ते २४० फळे निघत गेली. आमच्या शेजारील व इतर लोकांच्या टोमॅटोच्या प्लॉटच्या तुलनेत आमचा प्लॉट सरस असून त्यांच्यापेक्षा टोमॅटोस कॅरेट (क्रेट) मागे १० ते १५ रु. चढता भाव मिळतो.

फळांना शाईनिंग फारच चांगली सापडून फळे वजनदार आहेत. अजून टोमॅटोची तोडणी चालू आहे. मागील ४ दिवसांपर्यंत एकंदरीत ६०० कॅरेट निघाले. बाजारभाव ६० ते ९० रु. कॅरेट असताना आम्हांला ९५ ते ११० रु. प्रमाणे भाव मिळतो. इतर पिकांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले असून मी या औषधांबद्दल इतर लोकांना मार्गदर्शन करत आहे.