पंचामृताने टोमॅटोला जबरदस्त शाईनिंग व अधिक भाव

श्री. हणमंत जगन्नाथ पाटील,
मु.पो. करंजे, ता.जि. सातारा


मी के. व्ही. पी. इंजीनिअरींग कॉलेज सातारा येथे लायब्ररीमध्ये काम करतो. तेथे आपले 'कृषी विज्ञान' मासिक येते. त्यातील माहिती दर महिन्याला वाचत असतो. त्यातील माहिती अनुभवसिद्ध असल्याची जाणवली, त्यावरून सुरुवातील स्वतःच्या अनुभवासाठी १०० मिली पंचामृत टोमॅटोला आणले. तेव्हा फवारणी करताना शेती करणार भाऊ म्हणत होता की, ही औषधे आपण यापुर्वी कधीच वापरली नाहीत. त्यामुळे त्याचा फायदा होईल का ? त्याच काळात टोमॅटोचे भाव पडलेले होते त्यामुळे विनाकरण खर्च होईल असे त्याला वाटत होते. मात्र आपला माल चालू झाल्यावर भाव वाढले. या औषधांचा अनुभव असा आला की, या औषधाने झाडावर फळे भरपूर लागून, फळांना चमक, शाईनिंग जबरदस्त आली. त्यामुळे मार्केटमध्ये होलसेल ९ - १० रु. किलोने टोमॅटो विकला. त्यावरून मी काशिफळासाठी पंचामृत औषधांचा वापर केला.