२५ गुंठ्यात टोमॅटोचा १ लाख १० हजार सलग २ वर्षे

श्री. महादेव अंबु मुळे,
मु.पो. खंडाळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर


मी गेली तीन वर्षापासून डॉ. बावसकर टेक्नॉलॉजी ची औषधे टोमॅटोसाठी वापरत आहे. टोमॅटो लागणीपासून १५ ते २० दिवसाच्या अंतराने पंचामृताच्या फवारण्या दीड महिन्यापर्यंत घेतल्या. झाडे निस्तेज होती ती पंचामृतामुळे जोमदार झाली. बोकड्याचा संपूर्ण नायनाट झाला. माल भरपूर लागून एकसारखा पोसला. फळाला आकर्षक चमक आली. विशेष मणजे माल चालू झाल्यापासून ४ महिने चालला व शेवटपर्यंत एकसारखी फळे मिळाली. फळावर डाग नाही. कोणतीही विकृती नाही. झाडांची वाढ एकदम जोमदार होती. २५ गुंठे टोमॅटो क्षेत्रात १ लाख १० हजार रु. झाले. मागच्या वर्षी सुद्धा मी याच तंत्रज्ञाना ने एवढेच पैसे केले होते. ज्यावेळी मला माझे पाहूणे कांतीलाल माणिक डोंगरे यांनी हे पंचामृत तंत्रज्ञान वापरायला सांगितले तेव्हा माझा विश्वास नव्हता. परंतु त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून हे तंत्रज्ञान फवारले आणि स्वतः अनुभव घेतल्यावर माझा आत्मविश्वास वाढला. आता मी या तंत्रज्ञानाशिवाय काहीच वापरीत नाही. यावर्षी म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर २००४ मध्ये १२०/- रु. १० किलो असा भाव मिळायचा. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे मित्र श्री. राहूल सुभाष पाटणे आणि संतोष इंद्रजीत लोंढे यांनी सुद्धा मी सांगितल्यामुळे हे तंत्रज्ञान वापरले. त्यांना ३० गुंठे टोमॅटोमध्ये सव्वा लाख रु. मिळाले. टोमॅटोसाठी आणलेल्या औषधांमधून उरलेली औषधे काकडीला वापरली. तर काकडीचे वेल व्यवस्थित वाढले. माल भरपूर लागून फुले, फळे मिळाली. सध्या थंडी असूनसुद्धा काकडी वाकडी होते नाही. दुसऱ्यांच्या प्लॉटवर करपा, डावण्या झाला होता. २५ गुंठे काकडीचे ५ ते ६ तोडे झाले असून एका तोड्याला ५ क्विंटल माल निघाला. माल वाशी (मुंबई) मार्केटला पाठवित आहे. तिथे ७० ते ८० रु. १० किलो असा भाव मिळत आहे. मार्केट डाऊन असूनसुद्धा मला चांगला भाव मिळाला.