७ - ८ हजार रु. खर्च करून ७० - ८० हजार रु. टोमॅटोचे उत्पन्न

श्री. मल्हारी वामन आरेकर,
मु.पो. बहुळ, ता. खेड, जि. पुणे


चार वर्षापुर्वी थंडीत येणारी इंडम टोमॅटो १ एकर केली होती. रोपे जर्मिनेटर वापरून तयार केली. कल्पतरू खत माहित नसल्याने रासायनिक खते वापरली. पंचामृताच्या २ फवारण्या केल्या. माल भरपूर लागला होता. फुट झाली. १२ टन माल निघाला. ४० - ५० रु. १० किलो असा भाव मिळाला. दीड महिना टोमॅटो चालला. ७ - ८ हजार रु. खर्च झाला. खर्च जाऊन ७० - ८० हजार रु. झाले.

चालूवर्षी टोमॅटोची लागवड जुलै २००३ ला केली. आता फळे चालू झाली आहेत. मात्र फळे पिकात नाहीत. आहे तशीच हिरवी राहतात. सरांच्या औषधांनी माल भरपूर लागून लवकर पक्व होतात. त्यासाठी पंचामृत औषधे घेऊन जात आहे.