डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने भर पावसातही टोमॉटोचे मर नाही

श्री. केरू बच्छिराव नवले,
मु. पो. सारूळ (विल्होळी), ता. जि. नाशिक


मी माझ्या अर्धा एकर क्षेत्रात प्रथमच डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरली जबरदस्त उत्पन्न मिळाले. टोमॅटोचे दोन पाकिटे बी जर्मिनेटरमध्ये (२५० मिली पाणी + २० मिली जर्मिनेटर) ६ ते ७ तास भिजत ठेऊन गादीवाफ्यामध्ये लागले असताना सतत तीन दिवस मुसळधार पाऊस चालू असून देखील बियांची १००% उगवण झाली. रोपे दोन ते तीन पानावर आली असताना जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर चा स्प्रे दिला. (५ लि. पाणी + १५ मिली प्रत्येकी) त्यामुळे रोपांची मर झाली नाही. वाढ एकदम जोमाने झाली व रोपांवर कोणत्याही प्रकारचा रोग आला नाही. रोपे १७ ते १८ दिवसांतच लागवडीसाठी तयार झाली.

टोमॅटोची लागवड करताना रोपे जर्मिनेटर मध्ये बुडवून घेतली. लागवडीनंतर ८ ते ९ दिवसांनी जर्मिनेटर + थ्राईवर (१५ लि. पाणी + ५० मिली प्रत्येकी) स्प्रे दिला व आळवणी देखील केली. यामुळे झाडांची वाढ जोमदार झालीच शिवाय कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव माझ्या प्लॉटमध्ये झाला नाही. माझे शेड्युलप्रमाणे पंचामृत औषधाचे २ स्प्रे झाले आहेत. तसेच मी अर्धी एकर क्षेत्रासाठी ३० किलो कल्पतरू खत टाकले आहे. त्यामुळे मुळ्याची वाढ जोरात झाली आहे. फुलकळी भरपुर लागली आहे. माझे रिझल्ट पाहून आजुबाजुचे १० - १२ शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्या प्लॉटमध्ये पंचामृत फवारण्यास सुरुवात केली आहे.