पंचामृत फवारणीने टोमॅटो प्लॉट रोग व अळीमुक्त मालाची लवकर फुगवण

श्री. बबन भाऊराव गोडसे,
मु.पो. माडसांगवी, ता.जि. नाशिक


मागील वर्षी आम्ही एन.एस २५३५ जातीची टोमॅटोची एक बिघा लागवड केली होती. मी टोमॅटो बियांसाठी जर्मिनेटरचा वापर (३० मिली/लिटर) बी बुडवून लावण्यासाठी केली. उगवण उत्तम प्रकारे होऊन रोपे चांगली जोमाने वाढली. दर १० दिवसांनी जर्मिनेटर व थ्राईवर ३० मिली/ १५ लिटर पाण्यामध्ये रोपांवर फवारणी केली. लागवडीनंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने जर्मिनेटर, थ्राईवर व क्रॉपशाईनर प्रत्येकी ५०० मिली/१०० लि. पाण्यातून फवारण्या झाल्या. फुटवा मोठ्या प्रमाणात होऊन करपा, घुबडया, व्हायरस रोगाचे प्रमाण अगदीच नगण्य स्वरूपात होते. नागअळी आली नाही. रोगमुक्त झाडे होऊन फुलकळी मोठ्या प्रमाणत वाढली. १५ जून २००२ रोजीची लागवड होती. तिसऱ्या फवारणीमधील जर्मिनेटर + थ्राईवर + क्रॉपशाईनर बरोबर प्रोटेक्टंट व राईपनरचा प्रत्येकी ५०० मिली चा १५० लि. पाण्यातून केलेला वापर फारच परिणामकारक झाला. एका झाडावर २५० ते ३५० फळे मिळाली. फुगवण होऊन मालाला कलर आला. भाव नसताना सुद्धा सरासरी ४० ते ६० रु. दर मिळाला. ५०० ते ७०० जाळ्या (कॅरेट) माल निघाला.

टोमॅटोची दूरी (खोडवा) यशस्वी

आमही या टोमॅटो प्लॉटची दूरी (खोडवा) धरली त्यावेळेस जर्मिनेटर १ लि. ची २०० लिटर पाण्यातून फवारणी केली. फुटवा चांगला मिळाला. थ्राईवर व क्रॉपशाईनर ५०० मिली/१०० लि. पाणी या प्रमाणात फवारण्या करून खोडव्यात ३५० ते ४०० जाळ्या माल निघाला. रोगमुक्त झाडे झाली होती. ८० ते ९० रु. जाळी (कॅरेट) प्रमाणे दर मिळाला.