७०% करप्याने गेलेला टोमॅटोचा प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने सुधारला

श्री. संजय पाटील,
मु.पो. वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर


मी गेली १० वर्षापासून टोमॅटो, वांगी, काकडी ही पिके घेत आहे. सुरुवातीला रासायनिक खते वापरत होतो तेव्हा कीड, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असे. त्यावर रासायनिक औषधांच्या फवारण्या घेऊनही ते आटोक्यात येत नव्हते.

दोन वर्षापूर्वी मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांची माहिती मिळाली. तेव्हा रासायनिक औषधांबरोबर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे वापरण्यास प्रारंभ केला.

मार्च २००६ मध्ये २.५ एकर नामधारी २५३५ टोमॅटोची लागवड केली. एप्रिल - मे महिन्या उष्णतामान वाढल्याने टोमॅटोवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे टोमॅटो पिकाचे जवळजवळ ७०% नुकसान झाले होते.

यावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांच्या दोन फवारण्या आठ दिवसांच्या अंतराने केल्या, तर झाडांना नवीन पालवी फुटून तिची वाढही चालू झाली. हा अनुभव आल्यानंतर झाडांना जर्मिनेटरची आळवणी केली. तर झाडे सशक्त होऊन फुले, फळे भरपूर लागली.