सर्व प्रतिकूल परिस्थितीत गेलेल्या ढोबळीचे उत्पादन व उत्पन्न केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने!

श्री. मारोती धोंडीबा जवळकर,
मु.पो. आष्टी, ता. परतूर, जि. जालना - ४३१५०७.
मो. ९४०३४४८००६


आम्ही शेडनेटमध्ये सिंजेंटा कंपनीची ढोबळी मिरची १० मार्च २०१६ ला ५ x १.५ फुटावर लावली आहे. जमीन हलकी असून दुष्काळी परिस्थितीने आजुबाजूला कुठेही पीक नसताना बोअरच्या पाण्यावर हे पीक २५ गुंठ्यामध्ये घेतले आहे. रोपे २.३० रु./काडी प्रमाणे २० हजार रु. रोपावर खर्च झाला, शेणखत २५ हजार रु. चे (५ ट्रॉली) देऊन बेसल डोसला १५ ते १६ हजार रु. ची खते वापरली. ठिबकला ६० हजार रु. खर्च आला. असा १। लाख रु. सुरुवातीस खर्च आला.

उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने शेडनेट करूनही रोपांची मर होत होती. झाडे करपू लागली. पांढऱ्या मुळ्या फुटत नव्हत्या. आम्ही हे पीक पहिल्यांदाच घेतले होते. आणि खर्चही मोठ्या प्रमाणात झाल्याने काहीच सुचेनाचे झाले. अशा परिस्थितीत ५ एप्रिल २०१६ रोजी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी अशोक काटे हे आष्टी (धोतर जोडा) येथे भेटले. त्यांनी मला आधार देऊन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांनी प्लॉट दुरुस्त होईल असे सांगितले. मग प्रथम जर्मिनेटर औषध ठिबकमधून सोडून थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम या औषधांची फवारणी करण्यास सांगितल्यानुसार फवारणी केली तर मिरचीची मर जागेवर थांबून शेंडे वाढ होऊ लागली. फुटवा निघू लागला. एप्रिलच्या तिव्र उन्हातही म्हणजे ४६ डी. सें. तापमानातही मिरची हिरवीगार दिसू लागली. त्यानंतर नियमित आठवड्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी व मध्ये पांढऱ्या माशीसाठी रासायनिक औषधाची याप्रमाणे फवारण्या घेत असे. त्यामुळे पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होऊन फुलकळीही भरपूर लागली. साधारण मेच्या पहिल्या आठवड्यात मिरचीचे तोडे चालू झाले. २ ते ३ क्रेट मिरची सुरुवातीस निघू लागली. पुढे दर ४ - ५ दिवसाला ७ - ८ क्रेट (११ किलोचे) मिरची निघू लागली. नियमित डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यांमुळे मिरचीचे पोषण होऊन वजनदार, चमकदार व आकर्षक रंगाची मिरची बाजारात दिसत असल्याने भाव इतरांपेक्ष अधिक मिळत होता. सुरुवातीला ४०० ते ४५० रु./क्रेट (११ किलो) भाव मिळत होता. पुढे भाव वाढून ५५० ते ६०० रु./क्रेट होलसेल भाव आष्टी मार्केटला मिळू लागला. ३५०० ते ४००० रु. ४ - ५ दिवसाला मिळू लागले. असे १० जून पर्यंत ७ - ८ तोडे होऊन ३५ - ४० हजार रू. चे उत्पादन मिळाले.

ऐन उन्हाळ्यातील मिरचीवरील व्हायरस या घातक रोगापासून प्लॉट वाचून हे उत्पादन मिळत आहे याचे सर्व श्रेय डॉ.बावसकर तंत्रज्ञानाला देतो. कारण ही औषधे फवारणी पुर्वी (लागवडीनंतरच्या २० दिवसात) मी अनेक प्रकारची रासायनिक औषधे फवारून दमलो होतो. मात्र फरक काही पडत नव्हता. अशा विकत परिस्थितीतून प्लॉट वाचून हे उत्पादन मिळत होते. मात्र त्यानंतर १० जून च्या अचानक झालेल्या वादळी वाऱ्याने शेडनेटसह झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झाडांची फुलकळी झडली, फांद्या मोडल्या, त्यामुळे मालाचे तोडे थांबले. यावर परत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या चालू केल्या तर आज १७ जून २०१६ रोजी झाडे पुन्हा फुटली असून फुलकळी लागली आहे. आता ५ - ६ दिवसांनी तोडे सुरू होतील. पाऊस झाला पाहिजे. पाऊस झाल्यावर मालाचे पोषण नौसर्गिकरित्या होऊन माल वाढेल.