दुष्काळात पैसे देणारे पीक - 'सिद्धीविनायक' शेवगा, एकरी ७५ हजार नफा

श्री. पांडूरंग कदम,
मु.पो.कारखेड, ता.उमरखेड, जि.यवतमाळ,
मो. ८९७५८०८३०७मी २०१५ मध्ये पुण्यात प्रदर्शन पाहण्यास आलो असताना आपल्या स्टॉलला भेट दिली. त्यावेळेस मला शेवगा लागवड करायचे होते म्हणून मी आपल्या स्टॉलवरून 'सिद्धीविनायक' शेवगा बियाणे आणले व १ एकर शेवगा लागवड केली. त्यावेळेस मी बियाण्यासोबत जर्मिनेट, प्रिझम, हार्मोनी, थ्राईवर, क्रॉपशाईन, प्रोटेक्टंट ही औषधे सुंद्धा घेवून आलो. मी शेवगा बियाण्यास जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केली. त्याने ८०% उगवण क्षमता झाली. पण उगवाणीनंतर काही झाडे वानरांनी मोडून टाकली. त्यामुळे मी पुन्हा आपले 'सिद्धीविनायक' मोरिंगचे बी 'सहारा कृषी केंद्र ब्राम्हणगाव' यांचेकडून आणले तर आज रोजी माझ्याकडे एक एकर शेवगा आहे.

शेवगासाठी आपल्या कंपनीचे आमच्या भागातील प्रतिनिधी सतिश दवणे यांनी मला वेळोवेळी येवून मार्गदर्शन केले. मी सुरुवातीला लागवड केल्यानंतर जर्मिनेटर व प्रिझम प्रत्येकी १ लि. याप्रमाणे ड्रिपद्वारे आळवणी केली आणि आपल्या वेळापत्रकाप्रमाणे फवारणी केली. सप्तामृतच्या दोन फवारण्या केल्या. तर माझ्या शेतात ४ थ्या महिन्यात शेवग्याला फुल लागण्यास सुरुवात झाली. आमच्या भागातील 'सिद्धीविनायक' मोरिंगाचा हा पहिलाच प्लॉट आहे. ज्या लोकांकडे इतर जातीचं शेवगा होता ते माझ्या शेतातील 'सिद्धीविनायक' शेवगा झाडे पाहण्याकरिता येत होते. बहरलेली झाडे पाहून "तुम्ही काय केले, ते आम्हाला सांगा" असे म्हणत असत. मी त्यांना सांगितले, हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा 'सिद्धीविनायक' शेवगा आहे व त्यांची टेक्नॉंलॉजी या शेवग्याला मी वापरतो. कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीमध्ये हे शेवगा पीक घेतले आहे. आमच्या भागात दुष्काळ असतानासुद्धा 'सिद्धीविनायक' शेवगा हा हिरवागार, रसाळ व चवदार खाण्यायोग्य मिळत आहे. या शेवग्याची पहिली तोडणी ७ व्या महिन्यात केली. या बहारापासून मला एकूण ४० क्विंटल शेवगा शेंगा मिळाल्या. सुरुवातील ३३ ते ३४ रु./किलो भाव मिळाला. पुढे मार्कटमध्ये शेवग्याचे भाव कमी झाले तरी इतरांपेक्षा ३ ते ४ रु./किलो भाव जास्त मिळत होता. सरासरी २४ रु./किलो भाव मिळाला. माझ्या गावातील लग्नकार्यासाठी गावातील लोकांनी १० - १० किलो शेवगा नेला. खते, बियाणे, औषधे यांवर १२ हजार रु. खर्च आला होता. सर्व खर्च वजा जाता मला एक एकरातून ७५ हजार रु. निव्वळ नफा मिळाला. त्यामुळे 'दुष्काळात पैसे देणारे पीक' म्हणून 'सिद्धीविनायक' शेवग्याची नवी ओळख निर्माण झाली.

माझ्याकडे जून २०१५ मध्ये लावलेले अॅप्पल बोर आहे. आता या शेवग्याच्या अनुभवातून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर अॅप्पल बोरला चालू केला आहे. तसेच चालू पावसाळ्यात मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने २ एकर हळद लागवड करणार आहे. याबद्दल आमच्या भागातील प्रतिनिधी श्री. सतिश दवणे यांनी हळद पिकासंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच ऊस, कापूस, सोयाबीन, तूर या पिकांनादेखील कल्पतरू सप्तामृत वापरणार आहे.