संत्रा पन्हेरीत होणारी मर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने थांबून निरोगी पन्हेरीस इतरांपेक्षा दर अधिक

श्री. लिलाधरजी भोंडेकर, मु.पो. पुसला, ता. वरुड, जि. अमरावती -४४४९११. मो. ९९७५३२६३५५

मी गेल्या १० वर्षापासून संत्रा पन्हेरी (कलम) चा व्यवसाय करत असून दरवर्षी ४० ते ५० हजार पन्हेरी लागवड (तयार) करत असते. गेल्यावर्षी आमच्या परिसरामध्ये पन्हेरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन अनेक पन्हेरी वाया गेली. यासाठी वेळोवेळी रासायनिक औषधे वापरली. यासाठी ह्युमिक अॅसिड व कॉपरचे ड्रेंचिंग केले. तरीही पन्हेरीतील मर थांबत नव्हती. याच दरम्यान डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी सागर रेवस्कर भेटले. त्यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती देऊन पन्हेरीची मर थांबण्यासाठी जर्मिनेटर व प्रिझमची ड्रेंचिंग व जर्मिनेटर, प्रिझम, थ्राईवर, क्रॉपशाईनर आणि न्युट्राटोनची फवारणी करण्यास सांगितले. मात्र पन्हेरीवर अगोदरच खुप खर्च झाला होता. त्यामुळे अजून खर्च करण्याची मनस्थिती नव्हती. पण कंपनी प्रतिनिधींनी पुन्हा - पुन्हा खात्री दिल्यामुळे जर्मिनेटर व प्रिझमचे आठवड्यातून दोन वेळा ड्रेंचिंग केले तर ५ ते ६ दिवसातच पन्हेरीची मर कमी होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे लगेच जर्मिनेटर, प्रिझम, थ्राईवर, क्रॉपशाईनर आणि न्युट्राटोनची फवारणी केली. त्यामुळे मर तर पूर्ण आटोक्यात आलीच शिवाय पन्हेरीची काडी जाड होऊन पाने जाड हिरवीगार रुंद तयार झाली.

मागच्या वर्षी पाऊस व्यवस्थीत झाला नसल्याने संत्र्याच्या लागवडी फारच कमी झळया, त्यामुळे पन्हेरीची मागणी कमी होऊन भाव फारच कमी झाले. जी पन्हेरी यापुर्वी २५ ते ३० रु. ला विकली जायची तिला यावेळी ४ ते ५ रुपयाने मागणी होऊ लागली. मात्र अशा परिस्थितीतही आपली पन्हेरी टवटवीत, सशक्त, हिरवीगार असल्यामुळे १० ते १२ रु. दराने विकली गेली. त्यामुळे माझ्या पन्हेरीचा किमान खर्च तरी निघून काही प्रमाणात फायद्यामध्ये राहिलो. माझे काही मित्र होते त्यांना यावेळी पन्हेरीचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही.

माझ्याकडे संत्र्याची बागदेखील आहे. सागर रेवस्कर यांच्या सल्ल्यानुसार यावर्षी मी संत्रा झाडावर फुटीसाठी जर्मिनेटर व प्रिझम वापरले ते झाडांमध्ये सुधारणा होऊन फुट चांगल्या प्रकारे होऊन झाडे हिरवीगार दिसायला लागली.

Related New Articles
more...