ड्रॅगन फळ शेतकऱ्यांसाठी एक वरदान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


ड्रॅगन फळ हे २१ व्या शतकातील आश्चर्यकारक फळ म्हणून ओळखले जाऊ लागले असून त्याने भारतीय फलोत्पादनामध्ये सद्यस्थितीत एक क्रांती घडवून आणली आहे. शेतकरी आणि ग्राहकांना एक वरदान ठरले आहे. मुलत: सेंट्रल अमेरिका ते थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, बांग्लादेश या ठिकाणी यशस्वीरित्या व्यापारी पीक म्हणून घेतले जाते आणि आता ते भारतात येऊन पोहचले आहे.

परिचय : ड्रॅगन फळ हे मुळात एक निवडुंग वेल आहे. या फळांचे उगमस्थान सेंट्रल अमेरिका हे असून, आता खास उष्णप्रदेशीय देशामध्ये जगभरात घेतले जाते. ही वेल छत्रीसारखी दिसते व याला वाढीसाठी द्राक्षाप्रमाणे आधाराची गरज असते. साधारणत: या वेलीची आयुष्यमर्यादा १५ ते २० वर्षे एवढी असते. वाढीसाठी व आधारासाठी स्तंभ (पोल) व गोल कड्या यांची निवड करावी लागते. मुलतः पोषक जमीन आणि नियंत्रित व नियमितपणे खते दिल्यास योग्य उत्पन्न घेता येते. उष्णप्रदेशीय वातावरणामध्ये हे फळ घेणे पसंत केले जाते.

ड्रॅगन फ्रुटच्या फळाची चव साधारण परदेशी किवी फळासारखी असते. ती आंबट, खारट व थोडीशी गोड असते. प्रथम खाणाऱ्याला असे वाटते की, हे फळ अपक्व आहे. प्रथम याची चव ही आपल्या कल्पनाशक्ती पेक्षा वेगळी असते. या फळामध्ये काळसर रंगाच्या बिया असतात. त्या चविष्ट असतात. पिकण्याच्या अवस्थेत फळांची साल गुलाबी, चकाकणारी, घट्ट असावी. साल जर मऊसर असली तर ती फळे लगेच खाण्यासारखी असतात, परंतु ती लगेच खराब/नासतील असे समजावे. फळाला सालीचे जे पापुद्रे असतात ते ब्राऊन व ढिले असले तर ते फळ अधिक पिकलेले आहे असे समजावे. फळाला जेव्हा जखम झाली आहे, रंग गेलेला आहे, बुरशी येत आहे तेव्हा त्याचा दर्जा ढासळलेला आहे असे समजावे.

१०० ग्रॅम खाण्यायोग्य फळातील अन्नघटकांचे प्रमाण - प्रथिने ०. १९४ ग्रॅम, स्निग्धपदार्थ ०.४१ ग्रॅम, चोथा ०.८ ग्रॅम, कॅरोटीन ०.००८५ मिलीग्रॅम, कॅल्शियम ७.५५ मिलीग्रॅम, फॉस्फरस ३३.१५ मिलीग्रॅम, लोह ०.६ मिलीग्रॅम, जीवनसत्व बी-१ ०.१६१५ मिलीग्रॅम, जीवनसत्व बी-२ ०.०४४ मिलीग्रॅम, जीवनसत्व बी-३ ०.३६३५ मिलीग्रॅम, जीवनसत्व क ८.५ मिलीग्रॅम.

आरोग्य दृष्ट्या महत्त्व : ड्रॅगन फळामध्ये युनिव्हर्सिटी जेटच्या संशोधकांनी असे शोधून काढले की यामध्ये अत्यावश्यक फॅटी अॅसीड (जीवनसत्व ई) ने समृद्ध असते. यामुळे शरीराची झीज भरून निघते. जीवनसत्व ई हे शरीराला आत्यावश्यक असते. पिष्टमय पदार्थ हे त्वचेचे संरक्षण करतात. अमेरिकन आरोग्य संस्थेने असे शोधून काढले की मधुमेह व हदयविकार रोग्यांना ड्रॅगन फ्रुट सेवनाने दिलासा मिळतो. २००५ मधे एका वनस्पती संशोधकाला ड्रॅगन फळाची पाने, फळे, साल, फुले यामध्ये जखम भरण्याची क्षमता असते असे त्यांच्या संशोधनातून आढळले.

सौंदर्य प्रसाधने व मानवी विष्टा विसर्जनाच्या संशोधकांना ड्रॅगन फळाचा रसामध्ये प्रकृती चांगली ठेवणे, त्वचा (कातडी) तेजस्वी दिसणे व त्वचेच्या विकृत्ती कमी करण्याचे गुणधर्म आढळले. ड्रॅगन फळामध्ये कॅन्सर विरोधक व रक्तदाब कमी करणारे गुणधर्म आहेत. ड्रॅगन फळात जीवनसत्त्व बी १ अधिक असल्याने प्रतिकार शक्ती वाढते. मेंदू तरतरीत राहतो. या फळाच्या सेवणाने ताणतणावावर मात होते. डोळ्याचा मोतीबिंदू कमी होतो. पेशींची सुसुत्रता सांभाळते. एल्झामायर नावाच्या रोगावर आराम पडतो. पचनक्रिया सुधारते. यापासून खाण्याचे विविध प्रक्रिया पदार्थ तयार केले जातात.

उपयोग : ड्रॅगन फळ मधुमेह नियंत्रित करते.

* कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

* संधिवात रोखण्यास मदत करते.

* दमा रोखण्यास मदत होते.

* यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व प्रथिने भरपूर उपलब्ध असतात.

ठळक वैशिष्टये:

* ड्रॅगनच्या झाडास पाणी कमी प्रमाणात लागते.

* याला देखभाल खर्च कमी लागतो.

* या पिकास भारतीय हवामान पोषक आहे.

* २ ते ३ वर्षात गुंतवणूक खर्च निघतो.

* कर्टीगमुळे बंशवृद्धी करता येते.

* स्थानिक वआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे.

लागवडीच्या पद्धती व आवश्यकता :

जमीन : या फळ पिकासाठी जमीन योग्य निचरा असलेली, हलकी ते मध्यम व जमिनीचा सामू ६.१ ते ७.५ च्या दरम्यान असावा.

जमिनीची पूर्वे मशागत : यामध्ये नांगरणी मध्यम खोल करावी व तणमुक्त करावी. जमिनीची नीट उभी आडवी नांगरट करून कुळवाच्या आडव्या उभ्या दोन पाळ्या देऊन. धसकटे तण वेचून जमीन स्वच्छ व भुसभुशीत करून घ्यावी.

लागवडीची पद्धत : ड्रॅगन फळाची लागवड सर्वात सामान्य पद्धतीने म्हणजेच कटींगने केली जाते. याची बियाणे वापरून देखील लागवड करता येते. मात्र बियाणे पद्धतीला खूप वेळ लागतो व मातृ वनस्पती (Motherplant) चे गुण जास्त काळ टिकत नसतात. या कारणामुळे बियाणे बियाणे पद्धतीचा वापर व्यावसायिक शेतीसाठी केला जात नाही.

कटींग (Cutting) : हे मातृ वनस्पतीपासून मिळतात. कटींगची लांबी साधारणतः २० सेंमी पर्यंत असावी. कटींगची निवड करताना ती रोगमुक्त व किडमुक्त असावी. कटींग्ज किंवा काडीची लागवड पॉटमध्ये करतात. त्यासाठी पॉटमध्ये माती, शेणखत, वाळू यांचे २:१:१ किंवा शेणखत, माती, वाळू यांचे १:१:१ प्रमाण घेवून कटींग्ज लावावेत व हे पॉट सावलीमध्ये ठेवावेत. लागवड करताना जर्मिनेटर २० ते ४० मिली व प्रोटेक्टंट ३० ग्रॅम प्रति १० ली. पाणी याप्रमाणे वापरावे.

लागवडीचे अंतर : दोन झाडातील व ओळीतीळ अंतर २ मी. x २ मी. असाव व लागवडीसाठी ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे घेवून माती, शेणखत व २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खताने खड्डे भरून घ्यावेत.

वनस्पती घनता : एका एकरामध्ये जवळपास १७०० रोपे/वनस्पती किंवा वेली घेता येतात.

वाढ व आकारासाठी बांधणी : ड्रॅगन फळाची योग्य वाढ आणि विकास करण्यासाठी ठोस किंवा लाकडी स्तंभाची बांधणी करणे आवश्यक असते. कायमस्वरूपी स्तंभासाठी आर.सी.सी. सिमेंट क्रॉंकीट पोल उभारले जातात. अपरीपव्क खोड स्तंभाला बांधावे व बाजुंची (लॅटरल) खोडे ही मर्यादीत ठेवून मुख्य २ ते ३ खोडांची वाढ करावी.

खत व्यवस्थापन : ड्रॅगन फळाच्या वाढीसाठी शेणखत किंवा सेंद्रिय खते महत्त्वाची भूमिका पार पाडतात. प्रत्येकी वनस्पतीला किंवा वेलीला १० ते १५ किलो शेणखत आणि २५० ते ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. त्यानंतर दरवर्षी बहार धरताना मे - जूनमध्ये याप्रमाणेच सेंद्रिय खते द्यावीत. जमिनीचा प्रत फारच हलकी असल्यास सेंद्रिय खताप्रमाणेच अजैविक खतांची सुद्धा आवश्यकता भासते. ड्रॅगन फळांला बाह्यवृद्धीसाठी व झाडांच्या वाढीसाठी पोटॅश, फॉस्फेट व युरीयाची मात्रा पीक परिस्थितीनुसार तज्ञांच्या सल्ल्यानुसार द्यावी.

पाणी व्यवस्थापन : ड्रॅगन फळाला इतर फळांच्या तुलनेत कमी पाणी लागते. मात्र लागवडीच्या काळात, फुलोरा व वाढीच्या अवस्थेत तसेच गरम, कोरडे, उष्ण हवामानाच्या वेळी पाण्याच्या वारंवार पाळ्या आवश्यक आहेत. तसेच पाण्याच्या योग्य वापरासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो.

किटक व रोग : आपल्याकडे ड्रॅगन फळामध्ये अद्याप कुठल्याही प्रकारचे किड व रोग आढळलेले नाही. पण काही देशामध्ये बुरशीजन्य रोग आढळलेले आहेत.

झाडांच्या निरोगी व जोमदार वाढीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

१) पहिली फवारणी (लागवडीनंतर १५ ते २१ दिवसांनी ): जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + स्प्लेंडर १५० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी (लागवडीनंतर १।। ते २ महिन्यांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी २५० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.

उत्पादन चालू होईपर्यंत वरील फवारणी दरमहिन्याला आवश्यकतेनुसार घेणे. तसेच १ ते २ महिन्याच्या अंतराने जर्मिनेटर १ लि. + प्रिझम ५०० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे प्रती एकरी ड्रेंचिंग (आळवणी) करणे. पीक परिस्थतीनुसार वेळोवेळी आमच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तसेच ज्या अनुभवी शेतकऱ्यांनी याचे यशस्वी उत्पादन घेतले त्यांच्या प्लॉटला भेटी देऊन त्यांच्याही अनुभवाचा उपयोग घेऊन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे.

उत्पादन चालू होताना घ्यावयाच्या फवारण्या : १) पहिली फवारणी (बहार फुटण्यासाठी एप्रिल महिन्यात) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी १५० मिली + स्प्लेंडर १५० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (मे महिन्यात) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी २५० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (जून महिन्यात) : थ्राईवर ७५० ते १ लि. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ते ७५० ग्रॅम + प्रिझम ७५० मिली.+ न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ३५० मिली + स्प्लेंडर ३५० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (जुलै महिन्यात ) : थ्राईवर १।। लि. + क्रॉंपशाईनर १।। लि. + राईपनर १ लि. प्रोटेक्टंट १।। किलो + न्युट्राटोन १।। लि. + हार्मोनी ५०० मिली + स्प्लेंडर ५०० मिली + ३०० लि. पाणी.

यानंतर वरील चौथ्या फवारणीप्रमाणे दर महिन्यास फळे चालू असेपर्यंत फवारण्या करणे. ज्या शेतकऱ्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून यशस्वी ड्रॅगन फ्रुट उत्पादन घेतले त्यांनी त्यांचे अनुभव आमच्या स्थानिक प्रतिनिधी किंवा थेट पुणे येथील मुख्य कार्यालयास कळवावे म्हणजे नवीन शेतकऱ्यांना ते उपयोगी पडतील.

फळ काढणी : ड्रॅगन फळाला पहिल्याच वर्षापासून फळधारणा सुरू होते. या फळझाडाला मे ते जून मध्ये फुलधारणेला सुरुवात होते व ऑगस्ट ते डिसेंबर या काळात फळधारणा होते. साधारणतः फुलधारणेच्या एका महिन्यानंतर ड्रॅगन फळ तोडणीसाठी किंवा काढणीसाठी तयार होते.

अपरीपक्व फळाचा रंग हिरवा असतो व जेव्हा फळ काढणीला येते तेव्हा फळाचा रंग लाल होतो.

उत्पादन : ड्रॅगन फळाचे उत्पादन एकरी सरासरी ५ ते ६ टन अपेक्षित आहे. साधारणपणे लागवडीनंतर १८ ते २४ महिन्यानंतर फळे येतात. प्रत्येक फळ ३०० ते ४०० ग्रॅम वजनाचे असते.

अशा प्रकारे ड्रॅगन फ्रुट हे शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणारे फळपीक आहे यात शंकाच नाही.