मोरिंगा शेवग्यात २।। एकर हरभऱ्याचे आंतरपीक २५ क्विंटल उत्पादन

श्री. अशोक गोपाळराव डाके, (निवृत्त शिक्षक),
मु.पो. वडगाव (स्टे.), ता. सोनपेठ, जि. परभणी.
मो.९९२३६९१४२८माझी वडगाव (स्टे.) येथे ३० एकर जमीन आहे. त्या ३० एकर जमिनीपैकी मी उडीच एकर जमिनीमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून मोरिंगा शेवग्यात हरभऱ्याचे आंतरपीक घेतले. यासाठी विजय या वाणाचे बियाणे जर्मिनेटरची बिजप्रक्रिया करून पेरले. त्यामुळे उगवण चांगली झाली. हरभऱ्याला व शेवग्याला ठिबक केलेले आहे. शेवगा ८' x १२' अंतरावर ११ नोव्हेंबर २०१५ ला लावलेला असून त्यामध्ये मोकळ्या जागेत हे हरभऱ्याचे आंतरपीक घेतले आहे. मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी सय्यद फिरोज (मो. ९१६८२११३७६) यांचे मार्गदर्शन मिळाले व त्यांच्या मार्गदर्शनानुसार पेरणी व फवारणी केली. मी हरभरा पेरल्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे २५ दिवसानंतर जर्मिनेटर व प्रिझम या औषधाची पहिली फवारणी केली. माझ्या हरभऱ्याची जर्मिनेटर व प्रिझममुळे फुट चांगल्या प्रकारे झाली व नंतर मी ड्रिपद्वारे जर्मिनेटर व बाविस्टीन चे ड्रेंचिंग केली. त्यानंतर जेव्हा माझा हरभरा घाट्यात आला तेव्हा मी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन व प्रोटेक्टंट पावडर फवारले तर घाटे टपोरे, वजनदार, घट्ट भरले. मी हरभरा काढला तर हरभऱ्याचा उतारा एकरी १० क्विंटल मिळाला. म्हणजे अडीच एकरमध्ये मला २५ क्विंटल हरभरा झाला. मी हा हरभरा लातूरच्या मार्केटला घेऊन गेलो, तेथे हरभऱ्याला ४,८०० रु./क्विंटल भाव मिळाला. यासाठी एकूण खर्च २५,००० रु. झाला. खर्च वजा जाता निव्वळ नफा ७५,००० रु. मिळाला.

मोरिंगा शेवगा सध्या ६ महिन्याचा असून फुलकळी अवस्थेत आहे. काही झाडांना लहान - लहान शेंगादेखील लागलेल्या आहेत. सध्या फुल व शेंग गळ होऊ नये व शेंगा पोसाव्यात यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी चालू आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे मला हरभऱ्याचे जास्तीत जास्त उत्पन्न काढता आले व मी माझ्या आंब्याच्या बागेला व असाला सुद्धा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. मी शेतकरी बांधवांना इतकेच सांगू इच्छितो की आपण सुद्धा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी आवर्जुन वापरा व कमी खर्चात बदलत्या हवामानात चांगले उत्पादन घ्या.