मरयुक्त मोसंबीची झाडे पूर्ण दुरुस्त पाहून शेजारच्या शेतकऱ्यांनी वापरली डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

श्री. राजेन्द्र विनायकराव सोरते,
मु.पो.ता. काटोल, जि. नागपूर - ४४१३०२.
मो. ९९२१५७८९११


मी काटोल येथील रहिवासी आहे. मी शेती करीत असताना माझे कृषी सेवा केंद्र देखील आहे. माझ्या शेतामध्ये मोसंबी व संत्रा झाडे आहेत. या वर्षी आमच्या परिसरामध्ये मोसंबी झाडे भरपूर प्रमाणात मर रोगाला बळी पडली. काही केले तरी मर रोग जाईना परंतु मी मात्र हिम्मत हरलो नाही. माझे दुकान असल्यामुळे मी खूप बुरशीनाशके व किटकनाशके वारपाली, परंतु विशेष समाधान मिळाले नाही. भरपूर कंपनीवाले आले त्यांनी पण शेतकऱ्यांना उपाय सांगितले, मात्र काही उपयोग झाला नाही. नंतर मी नागाअर्जुनचे निपीट १० ग्रॅम + १०० मिली जर्मिनेटर १०० मिली व १०० मिली प्रिझमची १० लि. पाण्यातून ड्रेंचिंग आठ दिवसातून एकदा केली व वरून फक्त जर्मिनेटर + प्रिझमची फवारणी केली. पाहता पाहता माझी मोसंबीची रोगट झाडे हिरवी होण्यास सुरुवात झाली. शिवाय त्या झाडावर बहार लागून फळे देखील यायला लागली. मला तर असे वाटले होते की, आता ही झाडे देखील वाळतील. मात्र माझी संपूर्ण झाडे जागेवर आली व मी माझ्या संपूर्ण शेतकऱ्यांना हाच उपाय सांगितले. त्यांची पण झाडे बरी होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर मी संत्रा फुटीसाठी तसेच झाडांची पत्ती वाढण्यासाठी जर्मिनेटर + प्रिझम देत असतो.

मी या वर्षी पुन्हा ६०० झाडे मोसंबीची लागवड केली व त्या मोसंबीवर सर्व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी नुसार स्प्रे घेत आहे.