कमी पाऊस, मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वापराने एकरी उसाचे उत्पादन ५५ टन

श्री. संजय फकिरराव वाघमारे, मु.पो. परजना, ता. उमरखेड, जि. यवतमाळ.
मो. ९६२३९४०३८९


माझ्याकडे वडिलोपार्जित ८ एकर जमीन आहे. त्यामध्ये मी कापूस,सोयाबीन,तूर,हरभरा, ऊस ही पिके घेत असतो. यावर्षी उसाची पारंपारिक पद्धत बंद करून काहीतरी नविन टेक्नॉलॉजी वापरण्याचे ठरविले. याच काळात मला आपल्या भागातील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. सतिश दवणे हे भेटले व त्यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या उत्पादनांबद्दल उसाचे तंत्रज्ञान सांगितले.

मी सुरवातीला जर्मिनेटरची बिजप्रक्रिया केली. सर्व रोपे ही निरोगी व एकसारखी दिसू लागली. नंतर कल्पतरू ३ पोते/एकरी दिले व जर्मिनेटर, प्रिझम यांच्या फवारण्या करत राहिलो तर माझ्या उसाच्या फुटव्यांची संख्या जास्त राहिली, यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे कमी पावसात सुद्धा कल्पतरू व आपल्या टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या केल्या असल्यामुळे लोकांचे उसाचे पीक वाळत असताना माझ्या शेतातील ऊस कमी पाण्यावरही हिरवा दिसत होता. अशा पद्धतीने मला दुष्काळात सुद्धा एकरी ५५ टन उसाचे उत्पादन मिळाले आहे. या अनुभवातून मी यावर्षी आपल्या टेक्नॉंलॉजीने हळदीचे पीक घेण्याचे ठरवले आहे.