उसास दर्जेदार काळोखी फुटवे भरपूर, आंतरपीक ३८ गुंठे टरबूज १३ टन, ४९,६५० रु.

श्री. श्रीकृष्णा आसाराम घाटूळ,
मु.पो. मंगरूळ नं.-१, ता.माजलगाव, जि. बीड,
मो. ९७६४३५१८०८.



७ जानेवारी २०१६ ला माजलगाव येथे तिरुपती कृषी सेवा क्रेंद्र दुकानात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. काटे यांची भेट झाली. त्यांनी आम्हाला उसातील आंतर पिकाचा सल्ला दिला.

मग आम्ही ३८ गुंठे उसाच्या क्षेत्रात आंतर पीक म्हणून टरबूज लागवड करण्याचे ठरवले व लगेच 'आयेशा' या जातीचे कलिंगड बियाणे खरेदी केले.

त्यासोबत १०० मिली जर्मिनेटर घेतले. बिजप्रक्रियापासूनचे डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून आम्ही दि. १५ जानेवारी २०१६ रोजी लागवड केली. काटेंनी पहिल्या पिकपहाणी दौऱ्यात आम्हाला ड्रेंचिंगसाठी जर्मिनेटर १ लि. आणि फवारणीसाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, हार्मोनी, प्रोटेक्टंट ही औषधे लिहून दिली, ती आम्ही आणली व त्यांची यथासांग फवारणी व आळवणी केली. आम्हाला पहिल्याच आळवणी व फवारणीचा परिणाम उसावर व टरबुजाच्या वाढीवर दिसून आला. नंतरच्या दौऱ्यात काटेंनी फुले व फळे लागल्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंटची फवारणी करण्यास सांगितले, त्याप्रमाणे फवारणी केली असता त्याचा अत्यंत प्रभावी परिणाम आम्हास दिसून आला. फुलगळ न होता फळांचे सेटींग एवढे झाले की आम्हाला काही फळे तोडून टाकावी लागली व एका वेलीस पाच ते सहाच फळे आम्ही जोपासली. तिसरी फवारणी केली तेव्हा आमच्या उसातील फुटवे वाढून टरबुजाच्या वेलींनी ५ x ५ चे अंतर झाकून गेले. वेली अक्षरश: एकात - एक अडकल्या होत्या आणि उसाचा गडद रंग पाहून चर्चचा विषय झाल्याने गावातील अनेक लोक माझी ही पिके पाहावयास येत होते.

टरबुजाचा आकार मोठा होऊन ८ किलोपर्यंत एक फळ भरत होते. व्यापाऱ्याने ४.७० रु./किलोने ९ टन ५०० किलो राशीचा माल जागेवरून नेला. आम्हाला ४४,६५० रुपये नगदी मिळाले व काही लहान आकाराच्या फळांची आम्ही हातविक्री केली. त्याचे ५००० रुपये नगदी बाजारात मिळाले. एकूण ३८ गुंठ्यात १३ टन टरबुज आंतरपिक मिळाले आणि उसाचा दर्जा एकदम सुधारला आहे. त्यामुळे आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वरदान ठरली आहे.