अति पावसात पिवळा पडलेल्या कापसाचे ७० ते ७५ क्विंटल दर्जेदार उत्पन्न

श्री. नारायण पंढरीनाथ सोनपावले, मु. पो. सिद्धनाथ बोरगाव, ता. सेलू, जि. परभणी.
मोबा. ९४०४०७२१०९


माहे जून २०११ मध्ये मल्लिका, ब्रह्मापारस, तुळशी कपाशीचे बियाणे घेऊन प्रत्येकी दोन एकर असे सहा एकरमध्ये ठिबकवर ५' x १॥' याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी एक बी टोकून लागवड केली होती.

५० किलोच्या ३ बॅगा प्रति एकरप्रमाणे रासायनिक खताच्या एकूण १८ बॅगा सहा एकरासाठी खुरपणीनंतर दिले. जमीन काळी कसदार चांगली आहे. पाऊस जास्त झाल्यामुळे काही झाडांची समसमान वाढ झाली नाही. काही झाडे पिवळी पडून ओबाळायला (सुकु) लागली होती. त्यावेळी माझे बंधू बी. एस. एन. एल. मध्ये गुलटेकडी, मार्केट यार्ड, पुणे येथे नोकरी करीत असल्यामुळे त्यांनी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाबद्दल पुणे ऑफिसमध्ये जाऊन सविस्तर माहिती देऊन मला त्यांनी कपाशीचे पुस्तक पाठवून दिले. पुस्तक वाचन केल्यानंतर माझे बंधुला जुलै - ऑगस्ट दरम्यान झाडे पिवळी पडत असल्यामुळे फोन वरून सविस्तर माहिती दिली. नंतर बंधू डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसमध्ये येऊन ऑफिसवरून मला फोन लावला परिस्थितीची एकंदरीत सर्व माहिती फोनवरून दिली. त्यांनी मला ५०० लि. पाण्यातून फवारणीसाठी जर्मिनेटर + थ्राईवर + क्रॉंपशाईनर + राईपनर + न्युट्राटोन प्रत्येकी दोन लिटर, प्रोटेक्टंट २ किलो बॅक्टोकिल २५ ग्रॅमची १२ पाकिटे (५०० लि. पाण्यासाठी) पुणे ऑफिसवरून एस. टी. पार्सलने सेलू येथे पाठवून दिले.

मी दोन दिवसामध्ये पुणे ऑफिसवरून सांगितलेल्या प्रमाणात फवारणी केली असता आठ दिवसामध्ये फवारणीनंतर पिवळे पडण्याचे प्रमाण कमी होऊन झाडे टवटवीत दिसू लागली. माझे शेजारचे शेतकरी विचारण्यास येऊ लागले. त्यानं मी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा अनुभव सांगत होतो. नंतर सप्टेंबर २०११ मध्ये थ्राईवर + क्रॉंपशाईनर + राईपनर + प्रोटेक्टंट प्रत्येकी ३ लिटर + बॅक्टोकिल २५ ग्रॅमची १४ पाकिटे (७०० लिटर पाण्यासाठीचे प्रमाण) घेऊन फवारणी केली. पाते, फूल भरपूर प्रमाणात लागून बोंडाचा आकार मोठा झाला. कापसाची बोंडे पांढरीशुभ्र, तेज मोठी, आकर्षक, वेचण्यास सोपा, मजुरांना सहज वेचता येऊन कवडी अजिबात नव्हती. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वापराने बोंडाचे वजन नेहमीपेक्षा दीडपट (६ ग्रॅम) भरत होते. सर्व वेचणीचा कापूस 'ए' ग्रेडमध्ये गेला. पहिल्या वेचणीलाच ३५ क्विंटल कापूस निघाला. त्यानंतर ३५ क्विंटल ते ४० क्विंटलचे दरम्यान कापूस निघाला असा एकूण ७० ते ७५ क्विंटल कापूस लागणीचा मिळाल्यावर खोडवा पीक (फरदड) साठी कल्पतरू ५० किलोच्या २० बॅगा + जर्मिनेटर + प्रिझम + कॉटन थ्राईवर + क्रॉंपशाईनर + प्रत्येकी ५ लि. + प्रोटेक्टंट ५ किलो + हार्मोनी १ लि. + बॅक्टोकिल २५ ग्रॅमची १५ पाकिटे घेऊन गेलो होतो. ते वापरल्यानंतर फरदडपासून ३० क्विंटल कापूस मिळाला.

या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पात्या १७० ते १८० एवढ्या लागून बोंडे वजनदार मोठी होती. कापूस वेचणीस सोपा व पांढराशुभ्र, लांब धाग्याचा मिळाला. वरील प्रतिक्रिया प्रत्यक्ष पुणे ऑफिसला येऊन देत आहे.