शहादा भागात अनेक वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर

श्री.अशोक लिमजी पाटील, मु. पो. डामरखेडा, ता. शहादा, जि. नंदूरबार


गेल्या १० वर्षापासून आपले तंत्रज्ञान वापरून १ नंबरने उत्पादन घेतले आहे. माझ्याकडे एकूण ३० एकर भारी काळी जमीन आहे. एक जरी मोठा पाऊस पडला तरी नंतर पिके पाण्याचा ताण सहन करू शकतात, परंतु २ - ३ वर्षापुर्वी पाऊस फार कमी झाल्याने १६ हजार फुट अंतरावरून पाईप लाईन करून बागायत केले आहे. गेल्यावर्षी १८ एकर जमिनीत नवबहार गुजरातचा कापूस घेतला होता. सुरूवातीपासूनच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचे फवारे घेतल्याने फुल पाकोळी, तुडतुडे, लाल्या, दह्या आले नाहीत व झाडांची फुट जोमदार व निरोगी झालेली होती. सप्तामृत औषधांच्या एकूण ४ - ५ फवारण्या केल्या होत्या, तर पात्या, फुलपगडी भरपूर लागून एका झाडावर २०० ते ३०० बोंडे होती. कापूस पांढराशुभ्र पुर्ण उमललेला निघाला. लेंडी (गोळी) निघालीच नाही. त्यामुळे वेचणीला जास्त खर्च आला नाही व बाजारभाव चांगला मिळाला. एकरी १० ते १२ क्विंटल उतार मिळाला.

बी. टी. कॉटन यशस्वी पावसाचा ताण सहन करण्याची ताकद

मे महिन्यात महिको बी.टी. या जातीचा २॥ एकर कापूस लावला आहे. ४ x ४ फुट अंतरावर लागवड केली. नेहमीप्रमाणे डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच्या फवारण्या करणार आहे. आतापर्यंत १ फवारणी झालेली आहे. पाऊस कमी असूनही १ - १॥ फुट उंचीची कपाशी आहे. पिकावर रोग - कीड अद्याप नाही. कोळपणी केल्यामुळे प्लॉट तणमुक्त आहे. पीक जोरदार असून शाईनिंग (काळोखी ) भरपूर आहे. फुट चालू झाली आहे. पावसाचा ताण पडल्यास लिप्टचे पाणी पाटाने देतो. फुलकळी साधारण पुढच्या आठवड्यात लागेल.