डॉ.बावसकर सरांच्या तंत्रज्ञानाचा दूत व त्याचे फायदे

श्री. शरद वासुदेव वडगावकर, रिटायर्ड MSEB कार्यकारी अभियंता, मु. पो. शेलूद, ता. भोकरदन, जि. जालना,
फोन नं. (०२४०) २३५६५९५


४॥' x ४॥' वर बी. टी. राशी -१ कापसाची लागवड जूनमध्ये केली. बियाजवळ अगोदर लावताना पारंपारिक पद्धतीने कल्पतरू टाकळे. जमीन तापलेली होती. एरवी तापलेल्या जमिनीत कोणत्याही कापसाची मर होते. मात्र जर्मिनेटर वापरल्याने उगवण लवकर होऊन मर न होता जारवा वाढला. शिवाय इतरांपेक्षा उशीराने लावूनही पिकाची वाढ इतरांपेक्षा जास्त दिसत होती. राईपनरसह सप्तामृतचे ३ - ४ स्प्रे घेतले. सरांचे प्रिझम, न्युट्राटोन अजून वापरले नाही. पाणी कमी आहे. रासायनिक खताचा वापर अत्यल्प केला. एका झाडास मोठी ८० ते १०० बोंडे होती. कपाशी डोक्यापर्यंत वाढली होती. जमिनीपासून ते शेंड्यापर्यंत संपुर्ण फुलपगडी लागून प्रत्येक फांदीवर ८ ते १२ कैर्‍या होत्या. झाडांना कैर्‍या व बोंडाचा भार पेलवत नव्हता. कापूस भरपूर फुललेला बर्फासारखा पांढरा, लुसलुशीत, पुर्ण उमललेला होता. त्यामुळे ५ रू. किलोप्रमाणे वेचणीचा दर असताना आम्ही ३ रू. किलो प्रमाणे बायांकडून वेचणी केली तरी लहान मुलांपासून ते एक बाई दिवसात २५ किलो कापूस वेचत असून ७५ रू. कमवत होती. म्हणजे आपले तंत्रज्ञान वापरून उत्पादन दर्जेदार, भरपूर आल्याने शेतकर्‍याचा आणि वेचणी उरकत असल्याने मजुरांनाही या तंत्रज्ञानाचा फायदा होतो.

आमच्या भागामध्ये कवडी बारीक राहिल्याने शिमग्यापर्यंत पर्‍हाटी जमिनीत राहते. त्यामुळे जमिनीचा कस वाया जातो. जमीन चांगली असल्याने मोठ्या भेगा पडतात आणि पर्‍हाटी उपटत नाही. परंतु आम्ही सरांच्या तंत्रज्ञानाने जानेवारीमध्ये पर्‍हाटी उपटून उसासाठी जमीन तयार केली. उसाची लागण फेब्रुवारीमध्ये केली.

प्रगतीशील शेतकरी श्री. दळवी, दाणापूर , ता. भोकरदन हे सरांचे दूत आहेत. ते मला सहकार्य करतात. त्यांच्याकडे द्राक्षाची बाग आहे. शेजारच्या ४ - ५ जणांच्या द्राक्षबागा खराब हवामानामुळे वाया गेल्या मात्र त्यांची बाग अजूनही सुस्थितीत आहे.