डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कपाशीची रोग प्रतिकारक शक्ती वाढते

श्री. प्रमोद देशमुख (B.Sc. Agri.), मु. पो. सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड,
फोन नं. (०२४६५) २२७८४८ / मोबा. ९८२३९८९९९७


डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर आम्ही मुख्यत्वे करून कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात करत असतो. त्यामुळे पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढत असल्याने रोग किडीचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे इतर बुरशीनाशके, किटकनाशके यांच्या फवारण्यांचा खर्च लक्षणीयरित्या कमी झाला आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे कपाशीच्या झाडाची जोमदार वाढ होत असून फुलपात्या अधिक लागतात, तसेच बोंडांचा आकर व वजनात वाढ होते. कवडीचे प्रमाण पुर्वीपेक्षा खूपच कमी झाले आहे. कापूस पांढराशुभ्र, लांब धाग्याचा मिळतो. शिवाय ३ ते ५ वेचण्यात पीक मोकळे होते. हा कापूस विक्रीला 'ए' ग्रेड मध्ये जातो.

तूर, उडीद, मूग या कोरडवाहू पिकांना डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले तर शेंगगळ कमी होऊन दाणे टपोरे मिळतात. आता आमच्या भागातील इतर शेतकरीही या पिकांना हे तंत्रज्ञान वापरत असून तेही दर्जेदार मालाचे उत्पादन घेत असल्याचे कळवितात.

संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी, जि. नांदेड ही संस्था गेल्या ५० वर्षापासून शिक्षण तथा ग्रामीण विकासाचे काम करते आहे. मी या संस्थेचा संचालक असून आम्ही १९९२ पासून नाबार्ड सोबत इंडो - जर्मन वॉटरशेड डेव्हलपमेंट ( Indo - German Water Shed Dev.) या कार्यक्रमात सहभागी आहोत. यामध्ये कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार हा मोठा भाग आहे. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर आमच्या भागातील शेतकर्‍यांनी करून स्वत:चा विकास साधावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.