जूनच्या कपाशीची पोळ्याला पहिली वेचणी

श्री. कुर्मदास वासुदेव काळे, मु. पो.मांगरूळ, ता. मोरेगाव, जि. यवतमाळ.
फोन नं. (०७१७२) २४०६५१


मी शिक्षक होतो. बल्लारशा नगरपालिकेत २१ वर्षे नोकरी केली. नोकरी करीत दुकान सुरू केले. त्यामध्ये बर्‍यापैकी यश मिळाले म्हणून दुकान मुलाकडे सोपवले व मी व्ही. आर. एस. घेऊन शेती घेतली. शेतीविषयक नवीन नवीन माहिती धेण्यासाठी किसान २००३ प्रदर्शनामध्ये पुण्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्टॉंलवरून कृषी विज्ञान मासिके घेतली. कृषी विज्ञानमधील शेतकऱ्यांचे अनुभव वाचून आपणही हे तंत्रज्ञान वापरावे म्हणून मी नागपूरवरून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी प्रत्येकी ५ लि. व कल्पतरू ५० किलोच्या २० बॅगा (सेंद्रिय खत) मागविले. पाहिला प्रयोग मी मारुती ९६३२ या कपाशीच्या वाणावर केला. माझ्याकडे विहीर व बोअर असल्यामुळे पाणी टंचाई नाही. ४ जून २०० ४ ला ५ बॅगा कपाशी बियाची दीड एकरात २॥' x २॥' वर लागवड केली. लागवड करतान कल्पतरू सेंद्रिय खत वापरले. परंतु लागवडीच्या वेळी मी बाहेरगावी होतो. त्यामुळे जर्मिनेटर वापरले नाही. नाहीतर ५ बॅगामध्ये ३ एकर लागवड झाली असती. कारण जर्मिनेटरमुळे उगवण शक्ती वाढते व त्यामुळे एका ठिकाणी एकच बी लावले तरी चालते. परंतु नेहमीच्या पद्धतीने एका ठिकाणी २ -२ बी लावले. कृषी विज्ञानमध्ये दिल्याप्रमाणे कपाशी उगवल्या नंतर १५ दिवसांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत औषधांची फवारणी केली. तर पिकाची वाढ, फुटवे जबरदस्त निघाले.

दरवर्षीपेक्षा आम्हाला या औषधांमुळे कपाशीची शाखीय वाढ अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून आली. एरवी कपाशी सरळ वाढते, त्यामुळे फुलकळी कमी लागते. परंतु सप्तामृत औषधांमुळे शाखीय वाढ होते. नंतर वेळापत्रकाप्रमाणे पुढील फवारण्या केल्या तर ४५ दिवसात फुलापात्या लागल्या.पोळ्यानंतर आठ दिवसांनी पहिली वेचणी केली. २ क्विंटल कापूस निघाला. विशेष म्हणजे दसर्‍याशिवाय कापूस निघत नाही, परंतु सप्तामृत औषधांच्या फवारण्या व कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे हे शक्य झाले.

त्याचवेळी आम्ही बियाणे कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावले व प्लॉट दाखविला तर त्यांचा विश्वासच बसत नव्हता की, आपल्या कपाशीला एवढ्या लवकर कसा कापूस लागला. तेव्हा आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची सप्तामृत औषधे व कल्पतरू सेंद्रिय खत वापरले असे सांगितले. या व्हराटीला एवढा कापूस आजपर्यंत पाहिलेला नाही, असे शेवटी त्यांनी सांगितले. एकूण दीड एकरात ११ क्विंटल कापूस मिळाला. इतरांना ५ ते ६ क्विंटल मिळतो, खर्चही खूप होतो. कारण सारख्या किटकनाशकांच्या फवारण्य कारवाया लागतात. तरी सुद्धा अपेक्षीत उत्पन्न मिळत नाही. परंतु डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने खर्च कमी होऊन उत्पन्न दर्जेदार व भरपूर मिळते.