कापसावरील पिठ्या ढेकणाचा प्रसार व नियंत्रण

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


राज्यात खरीपात कापसाचे सर्वाधिक उत्पादन मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात घेतले जाते. तसेच पश्चिम महराष्ट्रात फलटण, बारामती, सोलापूर भागात देखील कापसाखाली मोठे क्षेत्र आहे. या भागातील कापूस उत्पादन रब्बीनंतर उन्हाळी पिकांऐवजी कापसाची लागवड करतात.

पाऊस उशीरा व पुरेसा न झाल्याने खानदेश, मराठवाडा, विदर्भात अपेक्षित झाली नाही. उशीरा पावसामुळे उत्पादन घटणार हे निश्चितच आहे. अशातच इतर देशात कापूस लागवडीखालील क्षेत्र घटते आहे. अशा परिस्थितीत कापूस निर्यातीस वाव आहे.

सद्य परिस्थितीत मोजक्याच शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली आहे. ती कपाशी ८० ते ९० दिवसांनी असून पीक फुलपाती लागून बोंडे धरू लागले आहे. या कपाशीवर तुडतुडे, फुलकिडे या रस शोषणार्‍या किंडीबरोबरच पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे.

यापुर्वी भारतात गुजरातमध्ये १९९७ मध्ये देशी व संकरित कापसावर पिठ्या ढेकणाची मॅकोनेलिकोकस हिरासुटस ही प्रजात सर्वात प्रथम आढळून आली. सध्या अनेक शास्त्रज्ञांच्या मतानुसार भारतामध्ये पिठ्या ढेकणाचा प्रसार अमेरिकेतून पाकिस्तान मार्गे झाला आहे. सुरुवातीस गुजरात, पंजाब व हरियानाच्या विविध भागांत व नंतर महाराष्ट्रामध्ये पसरला.

आपल्या भागात पिठ्या ढेकणाच्या विविध प्रजातींपैकी फिनोकोकस सोलॅनोप्सीस ही प्रजात सर्वात जास्त प्रमाणात कपाशीवर आढळून आली आहे.

खानदेशात व विदर्भात कापसाभोवती मिलीबगचा (पिठ्या ढेकूण) प्रादुर्भाव अधिक प्रमाणात जाणवू लागला आहे.

हवामानातील बदलामुळे कीड रोगांचा फैलाव समजू लागला आहे. रसशोषक किडींच्या वाढीसाठी पोषक वातावरण (ढगाळ वातावरण) असल्याने किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे.

प्रौढ किटक एका रांगेत कोवळ्या भागावर बसून रस शोषण करण्याचे काम करतात. शेतकरी वर्ग या किडींच्या नियात्रणासाठी एकाच प्रकारच्या फवारण्य करतात. त्यामुळे त्यांच्यात (किडींमध्ये) विशिष्ट औषधांशी प्रतिकार क्षमता वाढत जाता आहे.

पिठ्या ढेकणाचे किटकनाशकांद्वारे नियंत्रण करणे खूप अवघड आहे. कारण त्याचे शरीर मेणासारख्या पदार्थाने झाकलेले असते. त्यामुळे औषधांचा असर त्याच्यावर सहजरित्या होते नाही. तसेच प्रजननक्षमता जास्त, कमी कालावधीचा जीवनक्रम आणि त्यांचा रांगत जाण्याचा गुणधर्म ही या किडीची झपाट्याने वाढ होण्याची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव दिसताच नियंत्रण करणे जरूरीचे आहे व त्याचा वेळीच प्रसार थांबवावा. याकिडीबद्दल जागरूक राहून त्यांचे योग्यप्रकार व्यवस्थापन करणे गरजेच आहे.

पिठ्या ढेकणाचे एकात्मिक व्यवस्थापन :

मागील वर्षीच्या कीडग्रस्त पिकाचा हंगाम संपल्यानंतर शेतातील पिकाचे अवशेष नष्ट करावेत.कपाशीच्या पर्‍हाटया शेतामध्ये रचून ठेवू नयेत.कपाशीच्या पर्‍हाट्या इंधन म्हणून जास्त दिवस साठवून ठेवू नयेत. प्रादुर्भाव ग्रस्त पर्‍हाट्या एका जागेतून दुसर्‍या जागी नेऊ नयेत.

१ )उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी.जेणेकरून जमिनीतील पिठ्या ढेकणांचे सुप्त अवस्थेतील अंडी पुंज उन्हामुळे नष्ट होतील.

२) प्रादुर्भावग्रस्त शेतातील वेचणी झाल्यानंतर पर्‍हाट्या उपसून नष्ट कराव्यात. खोल नांगरट करून २% मीथाईल पॅराथिऑनची भुकटी १० किलो प्रति एकरी टाकावी.

३)पिठ्या ढेकणाच्या पर्यायी खाद्य वनस्पती जे गाजर, गवत, पेठारी, बावची, रानभेंडी रूचकी, कोळशी इत्यादींचा वेळीच बंदोबस्त करावा.

४) शेताजवळील शोभिवंत झाडे जसे जास्वंद, क्रोटॉंन इत्यादी झाडांवरील पिठ्या ढेकणाचा बंदोबस्त करावा. जास्त प्रादुर्भाव झाला असल्यास संपुर्ण झाड उपटून नष्ट करावे.

५) प्रादुर्भाव ग्रस्त शेतातील वेचणी करताना मजुरांना व्यवस्थित मार्गदर्शन करावे. जेणेकरून पिठ्या ढेकणाचा प्रकार टाळता येईल.

६) पिठ्या ढेकणाचा प्रसार करण्यात मुंगळे महत्त्वाची भुमिका बजावतात. त्यामुळे शेतामधील व शेताच्या आजूबाजूची मुंगळ्यांनी वारूळे नष्ट करावीत. त्यासाठी क्लोरोपायरिफॉस २०% अडीच मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून जमिनीत सोडावे.

पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव सुरुवातीला शेताच्या कडेकडेच्या झाडांवरच व कमी क्षेत्रात होतो. तेव्हा फक्त प्रादुर्भावग्रस्त भागावरच किटकनाशकांचा वापर केला तरी कीड आटोक्यात येते. पुर्ण क्षेत्रावर फवारणीची गरज भासत नाही.

७)पिठ्या ढेकणाची पिके सुरुवातीला रंगणार्‍या अवस्थेमध्ये एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी रांगत जातात. तसेच पाने, खोड, शेंड्यावर फवारणी केल्यास काही पिठ्या ढेकून जमिनीवर पडतात. जिवंत राहिलेले ढेकूण परत झाडावर चढू शकतात किंवा जमिनीत खोल राहू शकतात. त्यामुळे फवारणी कपाशीवर केल्यावर झाडाभोवतालच्या जमिनीवरही करावी. म्हणजे जमिनीवरील पिठ्या ढेकणांचा नाश होईल.

पिकाची फेरपालट करावी. एकाच शेतात वर्षानुवर्षे कपाशीचे पीक घेऊ नये, तसेच जास्त प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये दुसर्‍या वर्षी कपाशीचे पीक घेण्याये टाळावे.

८) खुरपणी व कोळपणी वेळेवर करावी. तसेच शेतातील व बांधावरील तणांचा विशेषत : पिठ्या ढेकणाच्या पर्यायी खाद्य वनस्पतींचा बंदोबस्त करावा .

९) पिठ्या ढेकणावर उपजीविका करणारे क्रिप्टोलेमस मॉन्ट्रोझिरी, ढालकिडा, क्रायसोपा हे परभक्षी व लॅच्टोमेफट्रीक्स अफक्टोलोपी ह्या परोपजीवी मित्रकिडींचे संवर्धन करावे, ते कापसाच्या बागेत सोडावेत. त्याकरिता कापसामध्ये चवळी, मका, झेंडू या सापळा पिकांची लागवड करवी. म्हणजे त्यावर या मित्र किडींची वाढ होते.

१०) किटकनाशकासोबत घुण्याचा सोडा २० ग्रॅम १० लि. पाण्यासाठी वापरावा.

११) व्हर्टिसिलियम लिकॅनी (बगीसाईड, व्हर्टिमेक ) ही उपयुक्त बुरशी जी पिठ्या ढेकणास हानिकारक आहे.तिची फवारणी करावी.

१२) प्रोटेक्टंट ही वनस्पतिजन्य पावडर सर्व प्रकारच्या विविध किडी तसेच पिठ्या ढेकणावर प्रतिबंधक रामबाण उपाय आहे. त्यावः सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार वापर करावा.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा सुरूवातीपासून वापर केल्यावर सर्व कापूस तीन वेचण्यात वेचून सर्व 'ए' ग्रेडमध्ये जात असल्याने शेतकर्‍यास अधिक पैसे मिळतात. शिवाय शेत लवकर मोकळे होऊन उन्हाळी पिकासाठी वापरायला मिळते. त्यामुळे मशागत, खत, पाणी याचा खर्च वाचतो.