डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सार्‍या कुटुंबाची उन्नती केली

श्री. श्रीराम त्र्यंबक तायडे, मु. पो. कोऱ्हाळा बाजार, ता. मोताळा, जि. बुलढाणा.
मोबा. ९४०३२५६४९०


मी डॉं. बावसकर तंत्रज्ञान १९९५ सालापासून मिरची, कारले, कापूस , टोमॅटो या पिकांना वापरत आहे. चालू वर्षी जुलै २०११ मध्ये २॥ एकर कापसास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरली होती, तर २॥ एकरात कपाशीचे २५ क्विंटल उत्पादन मिळाले. खरीपाची परिस्थिती एवढी खराब होती, सर्वांचाच माल बारीक, कवडी झालेला होता. २ क्विंटलचाही उतारा काहींना बसला नाही, तेथे आम्हाला १० क्विंटलचा एकरी उतारा मिळाला. विशेष म्हणजे कापूस वेचताना बायांना त्रास झाला नाही. एरवी एका बाईकडून दिवसाला २५ किलो कापूस वेचला जातो, तेथे आमच्या शेतातील कापूस ती बाई ४० ते ४५ किलो वेचत होती. तिला ५ रू. /किलो वेचानीचा चालू दर दिला जात होता. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कापसाचे बोंड चांगले फुलले जाते. कवडी होत नाही आणि बाईस २०० ते २२५ रू. मजुरी मिळते.

पहिल्या बहाराच्या कैर्‍यांनी झाडे वाकली होती. चालू फडदडला देखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या तीन फवारण्या केल्या असून अजून एक फवारणी होईल. तरी सध्या ४० ते ५० कैर्‍या लागून पाती भरपूर आहेत आणि सुरुवातीला जे अडीच एकरात २५ क्विंटल उत्पादन मिळाले, तेवढेच उत्पादन फडदडपासून मिळेल असे प्लॉट पहिल्यानंतर लक्षात येते. आपला कापसाचा अनुभव यापुर्वी 'कृषी विज्ञान' फेब्रुवारी २०१० च्या अंकात आलेला आहे. तो वाचून परभणीचा शेतकरी आमचा कापसाचा प्लॉट पाहण्यास आला होता.

या वर्षी (जानेवारी २०१२) ३९५० रू./क्विंटल भाव चालू असताना व्यापारी आमचा कापूस पाहून ४१०० रू./ क्विंटल भावाने कापूस मागतात. सरांनी सांगितले की, लगेच कापूस विकण्याची घाई करू नका, चीन, पाकिस्तान येथील कापसाचे उत्पादन पुर व दुष्काळी परिस्थितीमुळे घटल्याने भारतातून यंदा ३०० लाख गाठी निर्यात होतील आणि त्यामुळे सरकारने जरी भाव वाढवून दिला नाही, तरी व्यापार्‍यांकडून ६७२५ रू./क्विंटलपर्यंत यंदा भाव मिळतील. हा भाव साधारण गुढीपाडवा ते अक्षय्यतृतीया दरम्यान अपेक्षीत आहे.

दिडशे वर्षापुर्वी ब्रिटिशांनी कोऱ्हाळ्याला मार्केट उभारले होत. ते पत्र्याचे शेड २००६ च्या चक्रीवादळाने उध्वस्त झाले. तसा पत्रा बाजारामध्ये आता कोठेही मिळत नाही. म्हणजे कोऱ्हाळ्याचे मार्केट हे ब्रिटीशांच्य काळापासून कापसासाठी प्रसिद्ध आहे.

तणनाशकाचा फवारा उडून खराब झालेल्या कपाशीच्या ओळी सुधारल्या

आमच्या गावातील श्री. गोपाल लांगडे यांच्या कपाशीच्या दोन्ही बाजूच्या शेतकर्‍यांनी मक्याचे पीक घेतले होते. अलिकडे मजुरांच्या समस्येमुळे सर्रास तणनाशकाचा वापर केला जातो. मक्याचे पीक घेतलेल्या दोन्ही शेतकर्‍यांनी तणनाशकाची फवारणी केली होती. मक्यामध्ये तणनाशक फवारल्याने ते कपाशीवरही उडाले. त्यामुळे कपाशीच्या दोन्ही बाजूच्या १० - १० ओळींतील पाने कोमेजली. आता ह्या ओळींतील पीक वाया जाणार अशीच परिस्थिती झाली होती. मात्र शेजारच्या माणसांनी सांगितले याकरिता श्री. श्रीराम तायडे यांना यावर उपया विचारा. त्यानंतर तो शेतकरी माझ्याकडे आला. त्यांना थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५०० मिली १०० लि. पाण्यातून फवारण्यास सांगितले. त्याने मरणारी कपाशी एकदम चांगली झाली. यावरून असे लक्षात आले की, काही प्रमाणात तणनाशकाने झालेले नुकसान डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने भरून काढता येते.

आता सरांचा शेवगा लावायचा आहे. गारवे सरांनी (मु. पो. पान्हेरा, ता. मोताळा, जि. बुलढाणा) बांधावर १०० सिद्धीविनायक शेवग्याची झाडे लावली आहेत. त्याचे २५ ते ३० हजार रुपये होतात. तो प्लॉट पाहून आम्ही बांधावरच शेवगा लावणार आहे. व त्याला सरांची तंत्रज्ञान वापरणार आहे.

सरांनी डॉ.बावसकर टिश्यू कल्चर लॅब सुरू होत असल्याची आनंदाची बातमी दिली. कारण डाळींब शेतीत ह्या तंत्रज्ञानाने क्रांती केली. आता मुळातच तेल्या रोग येऊ नये म्हणून या संस्थेने निरोगी रोपे, शेतकर्‍यांना पुरविण्याचा संकल्प केला आहे. तो पुरा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

१९९५ साली राहुरी विद्यापीठाच्या कृषी दैनंदिनीमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली. त्यानंतर पुण्याहून पंचामृत प्रत्येकी २ - २ लि. घेऊन गेलो होतो. त्याच्या कपाशी, मिरची, कारली व टोमॅटोवर फवारण्या घेतल्या तेव्हापासून आमच्या एकूण ६॥ एकर क्षेत्रावर हे तंत्रज्ञान वापरत आहे.

पीक   क्षेत्र   पुर्वीचे उत्पादन   डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने
आलेले उत्पादन  
मिरची   २० गुंठे   १५ ते २० हजार   ५० हजार  
कारले   ५ गुंठे   २ ते ३ हजार   १० ते १५ हजार  
टोमॅटो   १० गुंठे   ७ ते ८ हजार   ३५ ते ४ हजार  
कापूस   २॥ एकर   ५ + २ ते ३ क्विंटल / एकरी   १० + १० क्विंटल / एकरी  

जून -जुलैमध्ये लावलेले कारले पहिले पोळ्यापर्यंत (श्रावण) चालायचे. पोळ्याचेवेळी गणपतीत जास्त पाऊस पडल्याने कारले खरब होत असे, मात्र डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरायला लागल्यापासून मार्चपर्यंत म्हणजे जवळजवळ १० महिने जास्त चालते. शिवाय काराल्यास शायनिंग, चमक अधिक येते. पंचामृतासोबत प्रिझमचा देखील वापर कायम करतो. त्यामुळे न फुट निघणार्‍या कारले. मिराचीलाही प्रिझमने अधिक फुट येते.

१९९५ पुर्वी आमची परिस्थिती एकदम साधारण होती. बी पेरणी करण्यासाठी कर्ज काढून बी घ्यावे लागत. मात्र त्यानंत मी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने शेती करू लागल्यापासून प्रतिकुल परिस्थितीत देखील दर्जेदार उत्पादन घेऊ लागल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली. या तंत्रज्ञानामुळे माझा लहान मुलगा एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी झाला. तो औरंगाबादला व्हिडिओकॉन कंपनीमध्ये आहे. मोठा मुलगा डी. एड. झाला आहे मात्र नोकरीची अवस्था आता बिकट झाली आहे. शिक्षक होण्यासाठी भरतीला १० ते १२ लाख रुपये भरावे लागतात. तेव्हा सरांनी सांगितले तुम्ही डाळींब लावा. यावेळी सरांनी दुसरा अनुभव असा सांगितला की, कवठेमहांकाळ येथील शेतकरी श्री. सुरेश ज्ञानू कासार यांना डाळींबातून या तंत्रज्ञानाने खूप पैस मिळवून दिले. म्हणजे माझ्या लक्षात असे आले की, माझे वडील पारंपारिक शेती करत त्यावेळी आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती. मात्र मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने शेती करण्यास सुरुवात केल्यापासून परिस्थितीत सुधारणा झाली. मुलांना चांगले शिक्षण देऊ शकलो. घरी एक टू व्हिलर सहज घेवू शकलो. आता लहान मुलगा म्हणतो जीप घ्यायची. एवढा परिस्थितीत बदल झाला. या तंत्रज्ञानाने समाधानी आयुष्य झाले.

आमचे नाते - गोते जळगावला आहे. त्यामुळे तेथे गेल्यानंतर आपल्या कृषी विघ्यान केंद्रातून डॉ.बावसकर तंत्रज्ञान घेऊन जातो. बुलढाण्यातील विक्रेते सर्व तंत्रज्ञान ठेवत नाहीत (?) त्यामुळे आम्ही जळगावहून तंत्रज्ञान ५ - ५ लिटर घेवून जातो. या तंत्रज्ञानाने सुबत्ता निर्माण केली तेव्हा आमच्या १४ ते १६ वर्षाच्या अनुभवातून असे लक्षात आले की,तरुण भारतातील तरुण शेतकर्‍यांची आव्हाने हे तंत्रज्ञान १००% पुरी करेल आणि भारत एक समृद्ध देश या तंत्रज्ञानाने होऊन या देशाची शेती ही जगाला आदर्श ठरेल याची मला खात्री आहे.