डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपई व्हायरसमुक्त होऊन दर १० ते १८ रू. किलो, २० टनाचे २ लाख ६० हजार

श्री. अनिल लक्ष्मण पवार, मु. पो. चिंचोली भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर,
मोबा. ९९२१८१३४००


तैवान ७८६ पपईची ७०० रोपे १५ रू. प्रमाणे मोहोळवरून आणली होती. त्यांची लागवड ऑक्टोबर २००९ मध्ये ३० गुंठ्यात केली. जमिनीत लागवडीच्या अगोदर शेतात मेंढ्या बसविल्या होत्या. त्यामुळे लागवडीला काही खते दिली नव्हती.

लागवडीनंतर रोग - किडींच्या प्रतिबंधासाठी रासायनिक बाविस्टीन (बुरशीनाशक) तसेच किटकनाशकांच्या २ - ३ फवारण्या केल्या. पपई ३ महिन्याची असताना २ - ३ झाडांवर व्हायरसचा प्रादुर्भाव झाला होता. यावर रासायनिक औषधांची फवारणी घेतली, मात्र त्याने काही परिणाम झाला नाही. उलट दिवसेंदिवस व्हायरसचे प्रमाण वाढतच गेले. असे करता करता अर्धा प्लॉट व्हायरसग्रस्त झाला.

न्युट्राटोनमुळे पपईचा व्हायरस गेला

सुरुवातीला पंढरपूरमधील २ - ३ दुकानातून औषधे नेऊन वापरली होती. त्याने फरक न पडल्याने दुसर्‍या दुकानात गेलो. (कृषी पंढरी अॅग्रो, पंढरपूर) तेथून मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे न्युट्राटोन हे औषध देण्यात आले. त्याची प्रति लिटर पाण्यास ५ मिली प्रमाणे फवारणी केली. त्याने पाने पुर्ण आकसलेली होती, ती पसरट होऊ लागली. पाने व शिरांचा पिवळेपणा कमी झाला. म्हणून पुन्हा १५ दिवसांच्या फरकाने न्युट्राटोनची फवारणी चालूच ठेवली. पहिल्या तीन फवारण्यात प्लॉट पूर्णता निरोगी होऊन फलधारणा सुरू झाली.

त्यानंतर जमिनीतून मुळावाटे जर्मिनेटर १ लि. २०० लि. पाण्यातून सोडले. त्याने पांढरी मुळी वाढली आणि थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर आणि न्युट्राटोनच्या २ फवारण्या घेतल्या. झाडावर ४० - ५० फळे असताना १५ जुलैला तोडा चालू झाला. सुरुवातीला १५ दिवसाला ३ - ४ तोडे केले. १ ते २ किलोच्या दरम्यानची फळे मिळतात. तोड्याला २ ते २॥ टन माल निघत होता. नंतर ०: ०: ५० मुळावाटे देऊन देऊन राईपनर आणि न्युट्राटोनची फवारणी घेतली, त्याने माल वाढला. त्यामुळे आता तोडा आठवड्याला करावा लागत आहे. शिवाय तोड्याला ३ टनापर्यंत माल निघत आहे. पुणे मार्केटला १०,१४,१८ रू. किलो भाव मिळाला. माल के. डी. चौधरी यांच्याकडे विकतो. काही माल जागेवरून दिला. व्यापारी माल पाहून दर ठरवतो. ७,५०० किलो माल जागेवरून १२ ते १६ रू. किलोने गेला आहे. त्यांना आम्ही फक्त फळे तोडून रद्दी कागदात पॅकिंग करून देतो. पुण्याला १५ - १८ टन आणि जागेवरून १३ - १४ तन असा एकूण ३० टन माल निघाला.

पपईत कांद्याचे आंतरपीक, ४१ हजार रू. उत्पन्न

पपईमध्ये सुरुवातीला गरवा कांद्याचे आंतरपीक घेतले होते. तर फळे पोसण्याच्या अवस्थेतच कांदा काढणीस आल्याने काढणीपुर्वी १५ दिवस आणि नंतर काढणी होईपर्यंत पाण्याचा ताण बसल्याने पपईची काही फळे गळाली. नाहीतर अजून उत्पादन वाढले असते. तरी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने व्हायरसपासून प्लॉट मुक्त होऊन चांगले उत्पादन मिळाले.

कांदा २२५ पिशवी मिळाला. पंढरपूर मार्केटला ५०० ते ८०० रू. क्विंटल भावाने विकला. कांद्याचे ४१ हजार ५०० रू. झाले. पपईला आतापर्यंत रोपांसह रासायनिक खते, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर ३२ हजार रू. खर्च आला असून २ लाख ६० हजार रू. पर्यंत उत्पन्न मिळाले.