डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपई रोपांची मर थांबून लागवडीस तयार

श्री. रघुनाथ पंडीत पारखे, मु. पो. आपटी, ता. भोर, जि. पुणे,
फोन: (०२११३) २८०४२२


पपई बियाची ३ पाकिटे पुण्यामधून घेतली होती. त्याची लागवड पॉलिथीन पिशवीमध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात केली. मात्र १ महिन्याची झाडे झाली तरी वाढ २ ते ३ इंचाची होती. शिवाय त्यातील रोपांची मोठ्या प्रमाणात मर होत होती. तेव्हा कर्नावड, ता. भोरे येथील शेतकरी मेळाव्यामध्ये वरील समस्यांवर सरांना सल्ला विचारला असता सरांनी पंचामृत, प्रिझम, न्युट्राटोन औषधांची माहिती व फवारण्याचे प्रमाण सांगितले. त्यावरून २९ / ३/ ०५ ला पंचामृत, प्रिझम प्रत्येकी १०० मिली औषधे पुण्याहून घेऊन गेलो. दिलेल्या प्रमाणानुसार ४ दिवस दररोज फवारणी केली. त्याने रोपांची मर पुर्ण थांबली. मग नंतर ८ दिवसांनी २ फवारण्या केल्या. तर लागवड करून १ महिना होऊनही जी ३ इंचच रोपे होती, ती आता दीड फुट उंचीची झाली आहेत. फुट व पाने रुंद, जाड व रसरशीत आहेत. रोपे सध्या टवटवीत आहेत. लागवडीस उशीर झाला. कारण उन्हाळी पाऊस झाल्याने जमिनीस वाफसा आला नाही. त्यातच पाण्याच्या मोटरमध्ये बिघाड झाल्याने लागवड लांबली. उद्या लागवड करणार आहे. जमीन लाल मातीची आहे. लागवड ६' x ६' वर करणार आहे. त्यासाठी १०० मिली पुर्ण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (सप्तामृत) आणि कल्पतरू १० किलो घेऊन जात आहे. पपईबरोबर इतर भाजीपाला पिकांनाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करणार आहे. 'कृषी विज्ञान' मासिक २ - ३ महिन्यापासून मी नेहमी वाचतो.