अती थंडीत दुष्काळी भागात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वरदानच !

श्री. भास्कर माधवराव पाटील, मु. पो. मार्डी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर,
फोन. (०२१७) २८११०२२


मध्यम प्रतीच्या जमिनीमध्ये इनलाईन ड्रीपची व्यवस्था केली आहे. ६ - ६ फुटावरून लाईन असून २, ५ फुटावर ड्रीपर आहे, यामध्ये तैवान ७८६ ची ६' x ५' वर १००० रोपे २५ ऑक्टोबर २००७ ला लावली आहेत. पपईला सुत्रकृमीचा प्रादुर्भाव होऊ नये. याकरीता ५ - ५ फुटाच्या दोन पपईच्या रोपांमध्ये जे २.५ फुटावर ड्रीपर आहेत, तेथे एका ड्रीपरवर झेंडूची दोन्ही बाजूला १ - १ अशी २ रोपे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लावली आहेत. झेंडूची रोपे २ रू. प्रमाणे नर्सरीतून आणली होती. हा झेंडू १५ डिसेंबरला चालू झाला. ५० - ६० किलो माल तोड्याला निघतो. आतापर्यंत ७ - ८ तोडे झाले आहेत.

१५ जानेवारीपासून आजपर्यंत महिनाभर कडाक्याची थंडी पडत असल्याने तापमान अगदी ३ - ४ डी. सें. इतके खाली आले आहे. त्यामुळे पपईची पाने कडेने करपत आहेत. तर काही झाडांवर व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. झेंडूचाही माल कमी झाला आहे. यासाठी गेल्या आठवड्यात सप्तामृत १ - १ लि. आणि कल्पतरू खत नेले होते. सप्तामृताची फवारणी करून पपईला प्रत्येक झाडास ५० ग्रॅम (२ काडेपेटी) एवढे कल्पतरू खत दिले आहे. अगोदर रासायनिक खते १० :२६:२६ च्या २ बॅगा आणि डी.ए.पी. च्या २ बॅगा असे दर महिन्याला खत दिले होते. त्यामुळे कल्पतरूची मात्र कमी दिले आहे. सप्तामृताची फवारणी केल्याने पपईची पाने पुन्हा पुर्वीसारखी पसरट, हिरवी होत आहेत.

जिप्सी काकडीचीही १ नोव्हेंबरला ड्रीपरवर ९ x २॥ फुटावर एक एकरमध्ये लागवड केली आहे. ड्रीपरच्या ठिकाणी लाईनच्या दोन्ही बाजूला १ - १ फुटावर २ -२ वेल आहेत. १५ जानेवारी २००८ ला तोडा चालू झाला. १- २ दिवसाड तोडा करतो. तर १५ ते २० पोती निघतात. मात्र गेली १५ -२० दिवसांपासून (२० जानेवारी ते १० फेब्रुवारी २००८) खुपच थंडी वाढल्याने पाने खराब झाली आहेत आणि मालही कमी पडला आहे. फक्त २- ३ पोती निघतात.

आमच्याकडे भारनियमन दिवसा असल्याने रात्री - अपरात्री पाणी द्यावे लागते. दररोज २ तास ड्रीप चालू ठेवतो. प्रत्येक ड्रीपरमधून तासी ५ लि. प्रमाणे १० लि. पाणी दररोज देतो. वरील पिकांना खत - पाणी भरपूर देऊनही रोगट असल्याने सरांचा सल्ला घेण्यासाठी आलो आहे. सरांनी सांगितले, सध्याचे तापमान ३ - ४ डी. सें. एवढे कमी झाले आहे. तसेच तुम्ही पाणी देत आहात ते रात्री, तेही जादा प्रमाणात त्यामुळे जमिनीत अधिक गारवा तयार झाल्याने पाने खालून ओलसर तर वातावरणातील तापमान खाली आल्याने वरून थंडावा, त्यातच अपुरा सुर्यप्रकाश या सर्व विरोधी घटकांमुळे पिकांना सुर्यप्रकाश कमी मिळाल्याने प्रकाश संश्लेषण व्यवस्थित होते नाही. तर जमिनीत अधिक ओलाव्याने पोकळी कमी होते. त्यामुळे पांढरीमुळीची वाढ थांबते, परिणामी वेलाचा शेंडा वाढ थांबते. आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने काकडीच्या पानांवर पांढऱ्या बुरशीची वाढ होते. एकंदरीत या वातावरणामुळे तसेच अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे मालाचे पोषण होत नाही. माल कमी निघतो.

त्यासाठी अशा थंडीमध्ये देशभर दिवसा १० ते ३ या वेळेमध्ये पाणी दिले गेले पाहिजे. तसेच ते पिकाच्या गरजेनुसार मोजकेच द्यावे. भारनियमनामुळे पुन्हा पाणी लवकर देत येते की नाही म्हणून अनावश्यक जादा पाणी देऊ नये. त्याचबरोबर जमिनीची पोकळी वाढण्यासाठी कल्पतरू सेंद्रिय खत एकरी २ ते ४ बॅगा २ टप्प्यातून द्याव्यात. म्हणजे जमीन भुसभुशीत राहील. पांढरी मुळीस पोकळी मिळून वाढ होईल. तसेच थंड हवेच पानांवर व फळांवर विपरित परिणाम होऊ नये. म्हणून या काळात सप्तामृतातील थ्राईवर, क्रॉंपशाईनर, न्युट्राटोन यांचे प्रमाण प्रती लिटर पाण्यामध्ये ५ मिली घ्यावे, म्हणजे अतिथंडीतही पिके तग धरून अपेक्षित उत्पादन मिळेल.