गेल्या २० वर्षात असा रिझल्ट पपईला मिळाला नाही

श्री. मारुती चांगदेव उपळे, मु. पो. उपळे, ता. बार्शी, जि. सोलापूर.
फोन - (०२१८४) २४५८२७


मी गेली २० वर्षापासून पपई करीत आहे. आतापर्यंत रासायनिक औषधे वापरत असे. शेणखत एकरी ४० बैलगाड्या देतो. रासायनिक खते अगदी थोडी वापरतो.

तैवान ७८६ पपईची रोपे बोडके (मोहोळ) यांचे नर्सरीतून ७ रू. / रोप प्रमाणे आणली होती. रोपांची लागवड हुंडी बसेल एवढा हाताने खड्डा उकरून ५ ऑगस्ट २००७ ला केली. लागवडीनंतर पाऊस २० - २२ दिवस सतत होता. २००० रोपे ७' x ६' वर २ एकरमध्ये लावली होती. पावसामुळे पाने पुर्ण पिवळी झाली होती. रोपे मरगळली होती. शेजारचे लोक म्हणत व्हायरस आला. त्याच आठवड्यात पुण्याला अगोदरच्या प्लॉटची पपई विक्रीसाठी घेऊन आलो होतो. तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफीसमधून पपईवरील समस्या सांगितल्यावर तेथील प्रतिनिधींनी सप्तामृत औषधे दिली. फवारताना पपई दीड महिन्याची होती. तर फवारणी केल्यावर तिसऱ्याच दिवशी सर्व शेंडे, पाने हिरवीगार झाली. म्हणून लगेच ७ व्या दिवशी दुसरी सप्तामृताची फवारणी केली. तर २००० झाडांतील फक्त ३५ झाडे गेलीत. बाकी सर्व जोमाने वाढली आहेत. सध्या २॥ महिन्यात ३ फुट झाडांनी उंची आहे. खोड पायाच्या अंगठ्याच्या जाडीचे आहे.

यापुर्वीच्य प्लॉटला पिवळेपणा आल्यानंतर दुसरी रासायनिक औषधे नेत असे. १३०० - १३०० रू. औषधांच्या २ फवारण्या घेतल्या, तरी फरक पडला नाही. हे दुकानदाराला सांगितल्यावर आलटून पालटून औषधे देत. तिसऱ्या वेळी ९०० रू . ची औषधे फवारली. तेव्हा कुठे फरक जाणवला. मात्र फळांवर अगोदरच्या रोगामुळे चट्टे पडले आहेत. तोच माल आज घेऊन आलो होतो. चट्टे पडल्याने भाव कमी मिळाला. तेही २ एकरच क्षेत्र आहे.

गेली वीस वर्षात असा रिझल्ट आम्हाला कधीच मिळाला नाही. जे फक्त १०० मिली सप्तामृत ३४३ रू. च्या औषधांनी अगदी तिसऱ्या दिवशी घडले. त्यामुळे हा प्लॉट तसेच या पुढे लागवड करणाऱ्या सर्व पपईला हे तंत्रज्ञान वापरणार आहे.

मी पपई शिवाय दुसरे कोणतेच पीक घेत नाही. आज पपई ७ - ८ रू. किलोने गेली. जून - जुलैमध्ये १५ -१६ रू. किलोने विक्री केली आहे. गेल्यावर्षी बाजार कमी झाले. होते तेव्हा ४ रू. किलो भाव मिळायचा व मालाला बार्शी ते पुणे वाहतुकच १.५ रू. किलो खर्च येत होता. त्यामुळे यावर्षी स्वत: ची टाटाची गाडी घेतली आहे. मुलगा गाडी चालवतो. त्यामुळे एकंदरी दाहतुक खर्च कमी झाला आहे.