अति उष्णतेने गळणाऱ्या पपईसाठी उपाय

श्री. नवनाथ पोपट गोसावी (बी. ए. इंग्लिश), मु. पो. उकडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.
फोन : (०२४८७) २५९२७९


तैवान ७८६ ची ५००० रोपे बोडके मोहोळ यांचे नर्सरीतून आणली. लागवड ८' x ८' वर केली आहे. सध्या (१ मार्च) झाडे ५ ॥ महिन्याची डोक्याएवढी आहेत. २ - ३ महिन्यापूर्वी अति थंडीने पाने आकसत होती. शेंडा वाढत नव्हता. तेव्हा साप्तामृत १ - १ लिटर फवारले. रोग आटोक्यात आला.

सध्या उष्णता वाढली आहे. आमच्याकडे ४० - ४४ डी. से. तापमान आहे. झाडावर १५ -२० फळे लांबट गोल आहेत. इनलाईन सव्वाफुटावर ड्रीपर आहे. उष्णता वाढल्याने पाने व सुपारी, लिंबासारखी लहान फळे गळून पडत आहेत.

सरांनी सांगितले, तापमान वाढल्याने उष्णतेने फुलांचा फळांचा देठ सुकतो व वाऱ्याने फुले, फळे गळतात. अशावेळी पुर्व व उत्तरेकडील फळांची गळ कमी मात्र पश्चिम व दक्षिणेकडील गळ अधिक होते. यासाठी ५००० झाडांसाठी जर्मिनेटर ५ लिटर, थ्राईवर ७ लिटर, क्रॉंपशाईनर १० लिटर, न्युट्राटोन ५ लिटर, प्रोटेक्टंट ५ किलो, स्ट्रेप्टोसायक्लीन १० पाकिटे २००० लिटर पाण्यातून संध्याकाळी ६ ते ८ यावेळेत फवारणे. सकाळी फवारायचे झाल्यास ६ ते ९ पर्यंत फवारणे.

तसेच उन्हाळ्यामध्ये आतापासूनच पाणी दिवसा ८ ते ६ वाजेपर्यंत देऊ नये. संध्याकाळी ६ व सकाळी ८ या दरम्यान २ तास ठिबक चालू ठेवणे. तसेच पपईचे पोषण होण्यासाठी उष्णता वाढल्याने ठिबकाचे पाणी पुरणार नाही. तेव्हा फ्लडने (पाटाने) पाणी द्यावे. हवेत उष्णता अधिक असल्याने तसेच जमीन तापलेली असल्याने दिलेल्या पाण्यापैकी निम्मेही पाणी पिकाच्या पांढऱ्या मुळीपर्यंत पोहचत नाही. तेव्हा पांढरी मुळी जळते. ती जगण्यासाठी व वाढण्यासाठी वरील फवारणीत क्रॉंपशाईनरचे ज्यादा प्रमाण सांगितले आहे. तसेच जमीन हलकी मुरमाड असल्याने मुळ्या उघड्या पडतील व ४२ ते ४६ डी. से. तापमानाचा परिणाम उघड्या मुळ्यांवर होऊन खोड आकसेल, फळे पिवळट पिंगट होऊन गर रबरासारखा तयार होईल. तेव्हा वरंबे जाड करून त्यावर पालापाचोळा, गवताचे आच्छादन करावे. यासाठी भात किंवा बाजरीचे काडाचे आच्छादन करू नये, कारण ते अधिक तापते. पाणी देताना आवर्जुन सांगितले की नुसत्या ड्रीपवर झाडांना पाणी पुरणार नाही. तेव्हा पाटाने पाणी द्यावे लागेल.

कल्पतरू खत देताना प्रत्येक सव्वा फुटावर पाणी पडते. त्या जागेपासून ३ इंचाच्या त्रिजेवर ५० ग्रॅम बांगडी पद्धतीने टाकून हलकेशे खुरप्याने मिसळून घेणे, जेणेकरून सराव खत वाफश्यावर जमिनीत मुळ्यांना पोहोचेळ त्याने झाडे जोम धरतील व पपई फळे पोसातील.

पेपेन करण्यासंबंधी सरांना विचारले असता सरांनी सांगितले, पेपेन काढल्यानंतर ती पपई टुटीफ्रुटीला चालते. ती मार्केटला चालत नाही. तेव्हा पेपेन काढू नये. आपल्या तंत्रज्ञानाने पहिल्या वर्षी १०० फळे प्रत्येक झाडावर घेता येतील आणि पुढील बहारास १०० फळे घेऊ तसेच या फळांना २ महिन्यांनी ४ - ६ रू. किलो भाव मिळेल आणि रमजानला १० रू. किलो भाव मिळविता येईल.