कासेगाव (वाळवा) भागातील पपईसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा अभिनव वापर

श्री. चंद्रकांत मारुती पाटील, मु. पो. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली


मी गेले ४ - ५ वर्षापासून ऊस, पपई या पिकांना डॉ.बावसकर तंत्रज्ञाना वापरत आहे. तर दरवर्षी उत्पादनात वाढ होते. उसाचा ७० ते ८० टन एकरी उतार मिळतो.

पपई ४ - ५ वर्षापासून करत आहे. २ एकरचे प्लॉट दरवर्षी असतात. एक प्लॉट २ वर्षापर्यंत चालतो. पपईला बियापासून हे तंत्रज्ञान वापरत आहे. सुरुवातीला बियांना जर्मिनेटर वापरले तर ८०% उगवण झाली. रोपे उगवून आल्यानंतर १५ दिवसांनी सप्तामृताची फवारणी घेतो. रोपांची वाढ होते. रोपांवर काळोखी येते. पानांची रुंदी वाढते. उंची एक फुट झाल्यावर खड्डे घेऊन लागवड करतो. खड्डे ७' x ७' अंतरावर आहेत. प्रत्येक खड्डयात शेणखत ५ - ६ किलो टाकतो. नंतर माती टाकून रोपांची लागवड करतो. रोपे जर्मिनेटर मध्ये बुडवून लावल्याने फुटावा व पांढऱ्या मुलीची वाढ लगेच ७ - ८ व्या दिवशी सुरू होते. नंतर एक महिन्याच्या अंतराने वेळापत्रकानुसार सप्तामृत फवारतो. फुलकळी लागतेवेळी शेवटच्या फवारणीत सप्तामृताचे प्रमाण वाढवून (१ लिटर पाण्यात प्रत्येकी ६ - ७ मिली) घेतो.

या फवारणीने फुलकळी भरपूर लागते गळ अजिबात होत नाही. याच अवस्थेत व्हायरसचा प्रादुर्भाव इतर शेजारच्या प्लॉटवर दिसून येतो. मात्र या औषधांच्या नियमित फवारण्यामुळे आपल्या प्लॉटवर व्हायरस किंवा करपा असा कुठलाच रोग येत नाही. फुलकळी लागल्यावर ३ महिन्यात माल लागतो. माल पूर्ण पोसला जातो. ८ ते ९ महिन्यात फळे तोडायला येतात तेव्हा ती २ किलोपासून ५ किलोपर्यंत तयार होतात. फळ गोळ व लांबट, चकाकी असलेले व चवीला इतरांच्या मालापेक्षा अतिशय गोड असते. पहिल्या तोड्याला एकरी ५ ते ७ ठेकी (३० किलोचे १ ठेके) माल निघतो. ४ - ४ दिवसांनी तोडा चालूच असतो. माल नंतर वाढत जातो. असा माल सरासरी मधल्या काळात ७० - ८० ठेकी प्रत्येक तोड्याला निघतो. ही पपई वर्ष दीड वर्ष चालते. शेजारचे प्लॉट १० - १२ महिने चालतात. आम्हाला ५ ते ६ रू. किलोचा दर मिळाला तर एकरी १ लाख रू. खर्च जाऊन निश्चित मिळतात.

या प्लॉटचा माल संपण्यापूर्वी दुसरा माल चालू व्हावा म्हणून आता २ - ३ एकराची लागवड करणार आहे. वरील प्लॉट एक - दीड वर्ष चालेल तोपर्यंत हा प्लॉट चालू होईल याला सुद्धा हे तंत्रज्ञान सुरूवातीपासून वापरणार आहे.