खानदेशात ७८६ ची यशस्वी लागवड

श्री. दिलीप दौलतराव देशमुख, मु. पो. पहूर, ता. जामनेर, जि. जळगाव.
फोन .(०२५८०) २४२२३९


पपईचे बी तैवान ७८६ जातीचे पुण्याहून घेतले होते. त्या बियाला जर्मिनेटरमध्ये भिजवून लावले. त्यामुळे बियाची उगवण १५% झाली व रोप सुरूवातीपासून निरोगी राहिले. बी उगवल्यावर १५ दिवसांनी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची फवारणी केली. रोपांची दीड महिन्याने ८' x ८' वर लागवड केली. प्रत्येक खड्डयामध्ये कल्पतरू ५० ग्रॅम टाकले. नंतर लागवड ऑक्टोबरमध्ये केली. जमीन मुरमाड आहे. पाणी विहीरीवरून ठिबक करून दिवसातून ४ तास देतो. १ महिन्याच्या अंतराने सप्तामृताच्या सहा फवारण्या केल्या. जूनमध्ये पपई मार्केटला विक्रीसाठी आली. या फवारण्यामुळे पपईला मार्केटमध्ये मागणी चांगली आहे. फळ १ किलोचे असून टिकाऊ असते. दर आठवड्याला २॥ टन माल निघतो. एकूण २८०० झाडे आहेत. एका झाडापासून साधारण १०० माल शेवटपर्यंत निघेल. आतापर्यंत ५ ते ६ तोडे झालेले आहेत. औरंगबाद, मालेगाव, धुळे, मलकापूर येथील व्यापारी शेतात येउन, स्वत: माल तोडून, रोख पैसे देऊन घेऊन जातात.

४०० ते ५०० रू. क्विंटलप्रमाणे सध्या भाव मिळत आहे. त्यासाठी इतर खर्च (तोडणी, वाहतूक, आडत) लागत नाही. आतापर्यंत १५ टन माल निघाला, ६० हजार रू. झाले आहेत. अजून मे महिन्यापर्यंत माल चालू राहिल. सध्या प्रत्येक झाडावर लहान मोठी ५० ते ६० फळे असून फुले चालू आहेत. तोडणीच्या २- ३ दिवस अगोदर सप्तामृत औषधांची फवारणी घेत असल्यामुळे माल मार्केटमध्ये तेजदार (उठावदार) दिसतो. त्याचा फायदा व्यापाऱ्याबरोबर आपल्यालाही होतो. कारण गिऱ्हाईक अशा प्रकारच्याच मालाची मागणी करते.