पपईची लोटरी

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


द्राक्ष, डाळींब,बोर,तरकारी, संत्री, मोसंबी, लिंबू अशा काही पिढीजात परंपरेपासून चालत आलेल्या लागवडीखालील क्षेत्र व विविध प्रयोग करून विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन काढणारे इस्राईल, अमेरिकेला मागे टाकणारे आपल्याकडील प्रगतीशील शेतकरी वर्ग नियंत्रित बाजारभाव व अशाश्वत बाजारपेठ, निर्यातीतील अतिघोर धोका या सर्वांना कंटाळू लागला होता. नुकताच परसातल्या डिस्को पपईने बाग दिला आणि काही लोकांना परिस घावल्यासारखे झाले. काही दिवस या पपई ने विक्रमी हवा केली. पण डार्वीनच्या सिद्धांताप्रमाणे हिला मागे सारणाऱ्या पुर्वेकडील तैवानकडून पपईची प्रभात झाली आणि साऱ्या शेतकऱ्यांची मने पिसाळल्यागत झाली. जो तो दिसेल तेथून मुंबई, सोलापूर,वाई, पुणे येथून आणि मंत्री, कलेक्टर असेल तर सिंगापूर, जर्मनीमार्गे तैवान पपई वाटेल त्या मार्गाने मागवून, अटकेपार झेंडा लावल्यासारखा आनंदात बागडू लागला. हे बी ज्या कंपनी ने २० वर्षापूर्वी काढले, त्यांचा हेतू शुद्ध असावा. कारण भारतीय वॉशिंग्टन, हनीड्यू, कोईमतूर १ ते ६ ह्या जातीची कारणपरत्वे खाण्याकरिता (Table Purpose) ते पेपेनसाठी लागवडीची मध्ये टुम निघत राहिली. पण व्यापारी वृत्तीमुळे कोईमतूर जातींनी बराचसा गाशा गुंडाळला.

तैवानची ७८६ ही जात उदयोन्मुख झाली ती तिच्या शेंड्यापासून थेट जमिनीपर्यंत फळे देणाऱ्या प्रवृत्तीने. गोडी बऱ्यापैकी कारण डिस्को याहून गोड असते, पण आकारमान (Mass), आकार (Shape) व दिसण्यात थोडी डावी असल्याने ह्या ७८६ पपई ने तिला ओव्हरटेक खरे तर टेक ओव्हर केले. अजून या पपईचे वैशिष्ट्य म्हणजे ७८६ पपईचा गार हा आकर्षक केशरी रंगाचा, एक वेगळ्या प्रकारचा स्वाद (Aroma) आणि आकार बहुधा लांबट गोल शेंड्याकडे २ - ३ डोळे नारंगी झालेले मधे आकारमानात मोठे व नंतर निमुळते होत ९" ते १४ " पपई लांब, साधारण प्रत्येक पपई २ किलो कमीत कमी ते थेट ५ किलो वाजापर्यंत भरत असल्याने मार्केटला नेऊन २० चा नामा या हिशोबाने विक्री करण्यापासून तो बागवान व निर्यातदारांनी किलोवर दिल्ली, लुधियानापासून दुबईच्या मार्केटमध्ये किलो वा टनाच्या भावाने विराजमान होते. बागायतदार व खरेदीदार यांच्या दोन्हीच्या हिशोबाने मार्केटचे समीकरण टू - वे ट्रॅफिकसारखे जमल्याने व त्याला आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची (डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची) जोड मिळून जेव्हां एकरी ३ ते ६ लाख रू. मिळविले, तेव्हा एका झाडास १०० ते २०० पपई व २० फळांचा नाम्याचा भाव २०० ते ३५० रू. अथवा २० रू. किलो असा भाव मिळतो असे काही सुरवातीच्या शेतकऱ्यांनी यश संपादन केले होते. तेव्हा ७८६ पपई लागवडीचे एकाच मोहोळ उठले. अलिकडे या पपईस कमीत कमी ४ ते १२ -१४ रू. किलो असे भाव मिळत आहेत. खरं तर पपई म्हटली की पिकल्यावर दुसरा दिवस काढत नाही. पण ७८६ पपई डोळे पडता पडता काढली तरी ४ - ६ दिवस म्हणजे मुंबई, दिल्ली किंवा कलकत्ता, बंगलोर, चेन्नई, तिरूअनंतपुरम, अलाहाबाद, अहमदाबाद वा कोल्हापूर, जबलपूर या वेगवेगळ्या इच्छित स्थळी (Destination) पोहोचणे या त्याच्या आणखी एका गुणधर्मामुळे लोकांनी तिला डोक्यावर घेतली व त्याच्या हवी हवीशी वाटणाऱ्या गुणधर्माच्या शिरपेचात यामुळे मानाचा तुरा बसला.

ही सफल उत्तराची कथा झाली दहा वर्षापूर्वीची. म्हणजे मागील दशकातली म्हणा ना ! आणि इतर बियांचे जसे दुप्लिकेटचे पेव फुटतात तसे या बियाचेही पेव फुटले. कारण या एका १० ग्रॅम पाकिटात साधारण ६०० बिया असतात. त्याची किंमत सुरुवातीला रू. २२०० वरून घसरत घसरत कधी - कधी मध्येच लुप्त होऊन परत ब्लॅक होत व 'रमजान' संपला की परत भाव खाली येऊन साधारण १७०० - १८०० रुपयांवर स्थिर झालेत. म्हणजे त्याच्या प्रत्येक बियांसाठी शेतकरी ३ ते ३॥ रू. मोजतो व आधुनिक तंत्रज्ञानाचा (जर्मिनेटरचा) वापर केला नाही तर २५ ते ३० % सुद्धा पपईची उगवण होत नाही. म्हणून मग आडमाप भावाने अनाठायी जादा पपई पाकिटे बिकट घेण्याची सधनांची प्रवृत्ती बळावली व प्रत्यक्षात ज्या पपईची किंमत निम्याहून मुळ ठिकाणी असते. तेथे या व्यवसायात पैसे मिळू लागल्याने या बियांच्या पाकिटाकडे सर्वसाधारण शेतकर्‍याचा बघण्याचा दृष्टिकोण सोन्याच्या बिस्किटासारखा झाला. यामुळे अधिक बी काही ठिकाणीच केंद्रीत झाले व त्यामुळे पपईतून समृद्धीच्या तुताऱ्या प्रत्येक जिल्ह्यातून ३ - ४ ठिकाणाहून वाजू लागल्या आणि मग इतर संकरीत पिकांच्या वाणासारखी या बियाण्यात विकृती (Deformity ), फळांचा दर्जा कमी - अधिक, भिन्न जातीची फळे एकाच झाडावर (Segregation) व्हायरसच अटॅक, नराचे प्रमाण जादा असणे या त्रुटी आढळू लागल्या.

या पपईस आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने फार मोठा हातभार लावला. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपईपासून खऱ्या कष्टातून अनेक लखोपटी घडविले. आजही हे पीक पंधरा वर्षानंतरही बऱ्यापैकी तग धरत आहे. मराठवाड्यात पाच वर्षापुर्वी ज्यांनी पपईचे पीक केले त्यांची काढण्याची वेळ व मार्केट न जमल्याने दिवाळीचे सुमारास या पपईचे मार्केट टोमॅटो व कांद्यासारखे निचांकावर म्हणजे ट्रकभर पपई ४००० रुपयांत विकली गेली. पण अशी वेळ क्वचितच नियोजनाच्या अभावामुळे येते.

पेपेनसाठी खास स्पेशल जातींची लागवड करतात. खऱ्या अर्थाने पपई मार्केट परदेशी खाण्यासाठी (Table pupose) म्हणून जास्त आहे. कारण मद्य, मांस, मसाले व मनी (पैसा) या चार मनकवड्या चटकदार गोष्टींमुळे बद्धकोष्ठ तेवर (Constipation) पपईचा फलाहार हा आयुर्वेदाचा म्हणजे निसर्गाचा एवढा चमत्कार आहे की, ईसबगोल अथवा इतर औषधे घेण्याची पाळी आखाती, पाश्चिमात्य व पुर्वेकडील राष्ट्रांवर कधीच येत नाही. त्याच्या आहारातील योग्य सेवनाने ' अ' व ' ड' जीवनसत्व भरपूर मिळत असल्याने उष्ण समशितोष्ण व थंड देशातील डोळ्यांचे विकारही बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येतात. म्हणजे शेवगा जे कार्य करतो तिच गोष्ट डोळ्यांच्या विकाराचे बाबतीत उन्नीस - बीस या फरकाने पपई कार्य करते.

म्हणजे बाह्य दृष्टी डोळस करणारी पपईच्या बाबतीत अंतरदृष्टी जर व्यवस्थित ठेवली (लागवड आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मार्केटचा अभ्यास इ. ) तर ७८ ६ पपई या वाणासारखे परंतु स्वस्त, दर्जेदार, खात्रीशीर वाण भारतीय शास्त्रज्ञांनी शोधणे गरजेचे आहे. म्हणजे जसे डाळींब अंजीर, भेंडी, रामफळ, सिताफळ बोर, मोसंबी, शेवगा, उन्हाळी कोथिंबीर व मुळा यांचे दर जसे १० - २० वर्षापासून शेतकऱ्यांना हमखास लॉटरीसारखे वाटतात तसेच सुज्ञ शेतकऱ्यांनी योग्य नियोजनाने पपयाची लागवड जर केली तर त्यांची प्रगती नजरेत भरण्यासारखीच होईल हे निश्चितच होय !