पपईचा रोपवाटिकेचा व्यवसाय व पपईचे पिकाचा नफा बहरला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे

श्री. विठ्ठल एकनाथ दातीर, मु. पो. खांबा, ता. संगमनेर, जि. अ.नगर


मी गेली ५ वर्षापासून पपईचे पीक घेत आहे. सुरूवातीला पहिल्या वर्षी १ एकर लागवड केली. त्यानंतर दुसऱ्या वर्षी २ एकरमध्ये लागवड केली. किटकनाशक किंवा बुरशीनाशक यांची एकही फवारणी न करता फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करतो. रासायनिक खताच्या तुलनेत शेणखत जास्त प्रमाणात वापरतो. तर पहिल्या वर्षी एक एकरात मुख्य पीक व खोडव्यापासून १ लाख ७५ हजार रू. झाले. दुसऱ्या वर्षी २ एकरमध्ये २,४०,००० रू. झाले. त्याचा खोडवा घेता आला नाही.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर सुरूवातीपासून करतो. बीजप्रक्रियेसाठी जर्मिनेटरचा वापर केल्याने बियांची उगवण नोव्हेंबर, डिसेंबरच्या ऐन थंडीतही ८० ते ८५ % होते. नंतर रोपांवर ३ फवारण्या सप्तामृत औषधांच्या करतो. त्यामुळे रोपांची वाढ जोमदार होऊन पाने हिरवीगार होतात.

दरवर्षी २५ ते ३० हजार रोपे तयार करतो. स्वत: साठी लागवडीस लागणारी रोपे ठेवून वाकीच्या रोपांची विक्री करतो. १० रू. प्रतिरोप या दराने जागेवरून रोपे विकतो.