राईपनमुळे पपईच्या पट्टी १०% वाढ

श्री. सतीश बी. चव्हाण, मु. पो. अंकुशनगर, ता. अंबड, जि. जालना.


माझेकडे एक एकर (७८६ तैवान) पपईची बाग असून त्यासाठी पहिल्यापासून मी पारंपारिक पद्धतीने पीक व्यवस्थापन करत होतो. दि. २८ -१२-२०० ६ रोजी मार्केटला पपई विक्रीसाठी गेलो असता सहज चौकशीसाठी फ्रुट मार्केटला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी मधून कल्पतरू सेंद्रिय खत व सप्तामृत औषधांसंबंधी माहिती घेतली. पपईचा दहा दिवसांच्या अंतराने तोडा चालू आहे. त्यासाठी अनुभवासाठी राईपनर १ लि. फवारणीसाठी घेऊन गेलो व लगेच दि. ३०डिसेंबर २००६ रोजी सांगितल्या प्रमाणे १५ लि. पाणी ७५ मिली राईपनर अशा प्रमाणात फवारणी केली असता दहा दिवसानंतर निघणारा तोडा सात दिवसात निघाला व फवारणीनंतर पपई मालाला कलर, शायनिंग एकदम चांगली आली. त्यामुळे वाशी मार्केटला दि. ६ जानेवारी २००७ रोजी माल घेऊन आलो असता मागच्या पट्टीपेक्षा १०% भाव जास्त मिळाले. त्यामुळे यापुढे सर्वच शेतीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे व आज रोजी आणखी राईपनर १ लि. घेऊन जात आहे.