४८ डी सें. ला अर्धापुरमध्ये उत्तम पपई

श्री. संभाजी जळबाजी कदम, मु. पो. पारडी, ता. अर्धापूर, जि. नांदेड,
फोन - २५०७४५


तैवान - ७८६, क्षेत्र - २ एकर, लागवड - १४ जानेवारी २००३

३८ वर्षे अकाऊंटंट म्हणून एस. टी. मध्ये होते. मुंबई, ठाणे, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, पुणे येथे काम केले. पहिल्याच वर्षी शेतीत उतरलो. ' कृषी विज्ञान' मासिक मिळाले. त्यातून माहिती मिळत राहिली. केळी, सोयाबीनला सप्तामृत औषधे यावर्षी वापरली. कल्पतरू एकदा वापरले. ३ एकर पपई , २ एकर केळी , ४ एकर ऊस आहे. उसाला पडताळा मिळत नसल्याने औषधे वापरत नाही. ६०० रू. टन भाव मिळतो. श्री. भाऊराव चव्हाण कारखाना येळेगाव ता. आर्धपुर येथे देतो.

कल्पतरू खत पिशवीत टाकून बियाला जर्मिनेटर वापरले ८' x ८' वर रोपे लाबून पाणी पाटाने देत होतो. उन्हाळ्यात ४८ डी. सें. तापमान असल्याने सप्तामृत कल्पतरू वापरून सुद्धा थोडी फुलगळ झाली. रोप लावताना कल्पतरू ५० ग्रॅम आणि नंतर २ वेळा २५० - २५० ग्रॅम प्रत्येकी झाडास दिले. फवारण्या १५ दिवसांनी करत होतो. फुलकळी ४ थ्या महिन्यात लागली. ५ व्या महिन्यात १६ ते २० पपई झाडावर होती. हे आलेल्या तज्ञांनी पाहिल्यावर आश्चर्य व्यक्त केले. (संद्रर्भ साठी पपई पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या कव्हरवर खालील बाजूस या प्लॉटचा तज्ञांसह फोटो दिला आहे.)

इतर पपईचे प्लॉट आमचे शेजारी होते. मात्र त्यांची ही टेक्नॉंलॉजी वापरली नसल्याने खोडे लहान. पाने निस्तेज, फिक्कट व उन्हाने जमिनीकडे झुकलेली होती.

जामठा गावातील मित्राची रासायनिक औषधे, खतावरील ३००० पपई झाडे आहेत. त्यांना फक्त दीड टन माल निघाला. श्री. अरुण पाटील यांच्या पपईवर उन्हाचा तडाका जमीन काळी असल्याने बसला तसेच व्हायरसचे थोडे प्रमाण होते, तेव्हा सरांनी सांगितले होते की, ४ - ८ दिवसात सप्तामृत औषधे वापरली तर वाचेल पण त्यांनी न एक्लायाने त्यांचा पुर्ण प्लॉट वाया गेला. माजी आमदार श्री.माधवराव पाटील, दिग्रज (यवतमाळ) आणि डॉ. बावसकर सरांबरोबर आम्ही वाटेने (रस्त्याने) प्लॉट पाहत पाहत गेलो.

पपई रमजानला येण्यासाठी या औषधांचा निश्चितच फायदा होईल. पपईचे झाडावर खोडापासून फळे लागलेली आहेत. हवामान प्रतिकुल असून सुद्धा २ ते २॥ किलोची पपई, आशी प्रत्येक झाडावर १०० फळे आहेत. सातत्याने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करत आहे. एका - एका झाडाला २ महिन्यापुर्वी १८० ते २०० फळे होती. आतापर्यंत ५ / ६ तोडे झाले आहेत. १७ - १८ टन माल निघाला. अजून ६० - ७० टन मला निघेल.